शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

गंभीर रुग्णाचा उपचाराविना मृत्यू; निरोप भेटूनही उशिरा आलेले वैद्यकीय अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 13:02 IST

suspension of Doctor डॉक्टर दोन तास उशिराने आल्याने कोरोना संशयित रुग्ण दगावला

ठळक मुद्देसाधारण महिन्यांपूर्वी एक रुग्ण कोरोना संशयित म्हणून दाखल झाला. अहवाल निगेटिव्ह आला, असे असले तरी त्याची प्रकृती अचानक खालावली.

बीड : कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची प्रकृती अचानक गंभीर झाली. याबाबत संबंधित डॉक्टरला कॉल केला. त्यांनंतरही ते दोन तास उशिराने पोहचले. तोपर्यंत रुग्ण दगावला होता. याची तक्रार करताच कामचुकारपणा करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब टाक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

साधारण महिन्यांपूर्वी एक रुग्ण कोरोना संशयित म्हणून दाखल झाला. त्याची चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असले तरी त्याची प्रकृती अचानक खालावली. याबाबत कर्तव्यावर असणारे फिजिशियन डॉ बाळासाहेब टाक यांना कॉल करून बोलावण्यात आले. तरीही ते वेळेत आले नाहीत. नातेवाईकांनि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांना फोन करून कल्पना दिली. डॉ थोरात यांनी सांगूनही ते उशिराने पोहचले. तोपर्यंत रुग्ण दगावला होता. यामुळे नातेवाईक आक्रमक झाले होते. याची तक्रार करताच समिती बसवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सर्व माहिती उपसंचालक यांच्या मार्फत आयुक्त, प्रधान सचिव यांना पाठवली. यात डॉ टाक दोषी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कामचुकपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

शासकीयकडे दुर्लक्ष; खाजगीवर भरजिल्हा रुग्णालयातील बहुतांश वैद्यकीय अधिकारी हे खाजगी सराव करतात. सरकारी रुग्णलयातील रुग्णाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या खाजगी दवाखान्यात अधिक वेळ बसतात. रुग्णाची पळवापळवी देखील केली जाते. यासाठी काही दलालांचीही नियुक्ती केली आहे. त्यांना कमिशन दिले जात असल्याचेही समोर आले होते. आशा प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. त्यातच वेळेवर उपचार मिळत नसल्याची ओरडही येत होती, याला आता या कारवाईमुळे दुजोरा मिळाला आहे. परंतु तक्रार केल्यास कारवाई होते, हे देखील सिद्ध झाले आहे.

हलगर्जीपणा व दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई कॉल देऊनही दोन तास उशिरा डॉ टाक हे सरकारी रुग्णलयात दाखल झाले होते. याबाबत तक्रार येताच चौकशी करून वरिष्ठांना अहवाल दिला होता. यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या नेहमी सोबत असू, पण रुग्ण सेवेत हलगर्जी व दुर्लक्ष करणाऱ्याला कधीच पाठीशी घातले जाणार नाही. - डॉ अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Beedबीडsuspensionनिलंबनdoctorडॉक्टर