शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपली अन् मागणी सुद्धा नाही, बीड जिल्ह्यातील सर्व टँकर बंद

By शिरीष शिंदे | Updated: July 9, 2024 12:52 IST

ग्रामीण भागातून टँकरची सध्या तरी नाही मागणी

बीड : ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुदत ३० जून होती व महिन्याभरात चांगला पाऊसही झाला आहे. या दोन्ही कारणांमुळे बीड जिल्ह्यातील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातून टँकरची मागणी सध्या तरी नाही. परंतु मागणी झाल्यास टँकर सुरू केले जाणार आहेत.

जिल्ह्यात जून महिन्यात व त्या आधी झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती बदलली. हळूहळू टँकरच्या मागणी कमी होऊ लागली. ७ जून रोजी बीड जिल्ह्यात ४६७ टँकर सुरू होते, तर २७ जून रोजीच्या अहवालानुसार २७७ टँकर सुरू होते. वास्तविकत: शासन निर्णयानुसार, पाणीटंचाई उपाययोजना म्हणून ३० जूनपर्यंतच टँकर पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर टँकर बंद करून आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू ठेवले जाणार होते. परंतु जून महिन्यात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील पाणी परिस्थितीमध्ये सुधारणा झाली. परिणामी, सर्व ठिकाणी असलेले टँकर बंद करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास ज्याठिकाणी टँकरची मागणी होईल, त्या गावामध्ये पुन्हा टँकर सुरू केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंदबीड जिल्ह्यात जून महिन्यात वेळोवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्या आधारावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जून महिन्यात आष्टी तालुक्यातील कडा या गावांसह इतर ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. चांगला पाऊस झाल्यामुळे पाटोदा, आष्टी, शिरूर या भागात पाणीटंचाईचे संकट तूर्त टळले आहे.

टँकर पुरवठ्यासाठी ३० जूनची मुदत होती. तसेच मागील महिन्यात चांगला पाऊसही झाला. तसेच तहसीलदारांनी टँकरसाठीचे प्रस्ताव नसल्याचे सांगितले. टँकरसाठी मागणी आल्यास मंजूर केले जातील.-शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडWaterपाणी