शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सासूच्या तिरडीला खांदा देत सुनांनी तोडल्या अनिष्ट प्रथा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:41 IST

नेत्रदानाचा संकल्पसुद्धा झाला पूर्ण

ठळक मुद्देसुंनाना दिले मुलीचे प्रेम

बीड : एखादी व्यक्ती मयत झाल्यावर तिला पुरूषांनी खांदा देण्याची परंपरा आहे. मात्र, बीड शहरात सोमवारी सकाळी एक वृद्ध महिला मयत झाल्यानंतर तिला पुरूषांनी खांदा न देता तिच्या चार सुनांनी दिला. आतापर्यंत मुलींनी पाणी पाजले, मुखाग्नी दिला, अशा घटना घडलेल्या आहेत. मात्र, चार सुनांनी किंवा महिलांनी तिरडीला खांदा दिल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

सुंदरबाई दगडू नाईकवाडे (८४ रा.काशीनाथ नगर, बीड) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. सुंदरबाई यांच्यावर दोन दिवसांपासून बीडमधील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, सुंदरबाई यांच्या तिरडीला त्यांच्या चार सुनांनी पुढाकार घेत खांदा दिला. लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे,  मनिषा जालिंदर नाईकवाडे, मिना मच्छिंद्र नाईकवाडे अशी त्या सुनांची नावे आहेत. सुंदरबाई यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नेत्रदानाची इच्छा पूर्णसुंंदरबाई यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांचे नेत्रदान करण्यास परवानगी दिली होती. आपणही मयत झाल्यावर आपलेही नेत्रदान करण्याची इच्छा त्यांनी मुलांजवळ व्यक्त केली होती. अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. जिल्हा रूग्णालयातील नेत्र विभागाच्या टिमने सोमवारी पहाटेपर्यंत शस्त्रक्रिया करून नेत्र संकलन केले.

सुंनाना दिले मुलीचे प्रेमएकीकडे अनेक घरांमध्ये सासू-सुनाचे वाद टोकापर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. तर दुसऱ्या बाजुला नाईकवाडे कुटूंब आहे. सुंदरबाई या आपल्या सुनांना मुलीचे प्रेम देत होत्या. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर सर्व सुनांचे प्रेम दिसून आले. हा सर्व प्रकार पाहून उपस्थित तर आश्चर्यचकित झालेच शिवाय त्यांचा टाहो पाहून उपस्थितांनाही आश्रु अनावर झाले. 

ए पोरी, नवी साडी घालना गं..सुंदरबाई व त्यांची मोठी सून लता यांनी सोबत गौरींची पुजा केली. यावेळी लता यांनी जुनी साडी घातली होती. ‘ए पोरी, नवी साडी घालना गं..’ असे म्हणत त्यांनी तिला मायेचे प्रेम दिले. तिला नवी साडी घालण्याचा हट्ट धरला होता, असे राधाकिसन नाईकवाडे सांगितले.

नाती घट्ट व्हावी रूढी, परंपरा बदलावी. सुनेबद्दल सासुचे आणि सासूबद्दल सुनेचे प्रेम कायम रहावे, तसेच नाते घट्ट व्हावे, या उद्देशाने हा सर्व प्रकार झाला. यासाठी आम्ही भावंडे आणि महिलांनी पुढाकार घेतला. नेत्रदानाची आईची इच्छाही पूर्ण केली. - राधाकिसन नाईकवाडे, बीड

टॅग्स :Beedबीडcultureसांस्कृतिकDeathमृत्यू