शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक ! बीडमध्ये कालबाह्य चॉकलेट-बिस्कीटांच्या विक्रीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 19:37 IST

कालबाह्य झालेले बिस्कीट, चॉकलेट व इतर प्रॉडक्टस् बीडमधील एजन्सीचालकाकडून विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे अन्न व औषध प्रशासनाने अचानक टाकलेल्या धाडीत तब्बल ८ प्रॉडक्टस् कालबाह्य झाल्याचे आढळले आहे.

बीड : कालबाह्य झालेले बिस्कीट, चॉकलेट व इतर प्रॉडक्टस् बीडमधील एजन्सीचालकाकडून विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने अचानक टाकलेल्या धाडीत तब्बल ८ प्रॉडक्टस् कालबाह्य झाल्याचे आढळले आहे. बीडच्या एजन्सी चालकाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.

शहरातील साठे चौकातील छत्रपती संकुलात असणाऱ्या श्रीराम दगडू लाखे यांच्या मालकीच्या पतंजली चिकित्सालय आलिश एजन्सीवर अन्न व औषध प्रशासनाने आज दुपारी साडेचार वाजता अचानक धाड टाकली. तपासणी केली असता यात तब्बल ८ प्रॉडक्टस् कालबाह्य झाल्याचे समोर आले. अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. भिसे, एच. आर. मरेवार, व्ही. ए. कुलकर्णी, बाळू शेंडगे यांनी हे सर्व नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, गुरुवारी ते औरंगाबादला पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.ही कारवाई सहाय्यक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, लाखे विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

योगाच्या माध्यमातून जाहिरातश्रीराम लाखे हे योग प्रशिक्षक आहेत. ते ठिकठिकाणी जाऊन आपल्या एजन्सीची जाहिरातही करतात. त्यामुळे नागरिक येथे खरेदीसाठी गर्दी करतात. यातूनच सर्वसामान्य नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन लाखे हे कालबाह्य झालेले प्रॉडक्टस् विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे योगा करायला लावून आरोग्य सुधारणा-या लाखे यांच्याकडून दुस-या बाजूला नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे समोर आले आहे.

कठोर कारवाई करण्यात येईलमाहिती मिळताच पतंजली एजन्सीवर जाऊन तपासणी केली. यावेळी ८ प्रॉडक्टस् कालबाह्य झाल्याचे आढळून आले. त्याचे नुमने औरंगाबादला पाठविले आहेत. लवकरच अहवाल प्राप्त होईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल. - अभिमन्यू केरुरे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :BeedबीडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfoodअन्न