महामार्गाचे काम अपूर्ण
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूरमार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याकडेला असलेल्या साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी आहे.
वाहतूक कोंडी हाटेना
अंबाजोगाई : शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यशवंतराव चव्हाण चौक हा मोरेवाडी परिसरात येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे. या मुख्य चौक परिसरात सध्या वाहतूक कोंडी होत आहे.
बाजारात अस्वच्छता
अंबाजोगाई : शहरातील मंडीबाजार परिसरात दररोज भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. व्यावसायिक लोक खराब भाजीपाला रस्त्यावर टाकत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. पालिकेने लक्ष देऊन परिसरात स्वच्छता करण्याची मागणी आहे.