शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य धोक्यात, मुंबईला गेलेल्या १९० चालक, वाहकांना कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:02 IST

मुंबईतील बेस्ट उपक्रमासाठी बीड विभागातून २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक आठवड्याला ४६० कर्मचारी  पाठविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देकुटुंबातही याबाबत भीती आहे

बीड :  मुंबई येथील बेस्ट उपक्रमासाठी बीड विभागातील चालक, वाहकांना रोटेशन प्रमाणे पाठविले जात आहे. ते परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली असता आतार्यंत तब्बल १९० लोकांना बाधा झाल्याचे उघड झाले आहे. हा उपक्रम सध्या तरी कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असून आता पुन्हा त्यांना मुंबईला पाठवू नये, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने महाव्यवस्थापकांकडे केली आहे. 

मुंबईतील बेस्ट उपक्रमासाठी बीड विभागातून २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक आठवड्याला ४६० कर्मचारी  पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत तब्बल १३५० कर्मचारी पाठविले आहेत. कर्तव्य बजावून ते परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली असता तब्बल १९० कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. परत येताना व आल्यावर त्यांचा कुटुंब, नातेवाईक, प्रवासी यांच्याशी संपर्क येत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहे. पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातही याबाबत भीती आहे. 

दरम्यान, जिल्यात दोन हजार कर्मचारी असून त्यांचे ३० नोव्हेंबरअखेरपर्यंत कर्तव्य बजावून पूर्ण होत आहे. यातील बहुतांश कर्मचारी हे वयोवृद्ध असल्याने त्यांना कोरोनाचा धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून बीड विभागातील एकाही कर्मचाऱ्याला पुन्हा या उपक्रमासाठी पाठवू नये, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे. 

मुंबई बेस्ट उपक्रमासाठी कर्मचारी पाठविले जात आहेत. आल्यावर चाचणी केली जाते. पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सेंटरमध्ये तर निगेटिव्ह असलेल्यांना निर्देशाप्रमाणे ७२ तास क्वारंटाईन ठेवले जात आहे. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे कर्मचारी पाठविले जात आहेत. -भगवान जगनाेर, विभाग नियंत्रक, रापम, बीड

मुंबई येथे जाऊन आलेल्या जवळपास १९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. यापुढे तरी त्यांना पुन्हा या उपक्रमासाठी पाठवू नये. सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती आहे.-राहुल बहिर, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार  सेना, बीड 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडstate transportएसटी