शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरातीत नाचताना चक्कर येऊन नवरदेवाच्या काकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : लग्नाच्या वरातीमध्ये नाचणाऱ्या ७० वर्षीय इसमाचा चक्कर आल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : लग्नाच्या वरातीमध्ये नाचणाऱ्या ७० वर्षीय इसमाचा चक्कर आल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आनंदाच्या सोहळ्यात या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला. मयत इसमाचे नाव मधुकर देविदास लिंगायत (वय ७०, रा. मालेगाव, जि. नाशिक) असून, ते नवरदेवाचे काका (मावशीचे पती) असल्याचे सांगण्यात आले.शहरातील वाणी मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी १२. ३० वाजता येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न होते. पैठण येथील मुलाकडचे वºहाड आले होते. परण्या निघाल्यानंतर मधुकर देवीदास लिंगायत हे गाण्याच्या तालावर डि.जे. समोर नाचत असताना अचानक चक्कर आल्याने खाली कोसळले. हे पाहून सोबत नाचणाºया पाहुणे व प्रत्यक्षदर्शी मंडळीने तात्काळ मधुकर लिंगायत यांना वाहनातून शहरातील एका खाजगी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत झाल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. मधुकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.लग्न समारंभ म्हणजे वर आणि वधूकडील कुटुंबासाठी आनंदाचा प्रसंग असतो. मात्र, लग्नसोहळ्याचे भान राखत घटनेची माहिती कोणालाही न सांगता लग्न उरकले. त्यानंतर ही घटना समजल्यावर सर्व लग्न समारंभात दु:खाचा डोंगर कोसळला. अनेकांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणी गेवराई ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास तपास एएसआय आईटवार करत आहेत.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू