गेवराई : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजाने काळजी करू नये, पालकमंत्री धनंजय मुंडे व माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून सरकारकडे प्रयत्न करून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन विजयसिंह पंडित यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिले. विजयसिंह पंडित यांनी रविवारी राजापूर, गोविंदवाडी व परिसराचा दौरा केला. या भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, पपई, मका, उन्हाळी बाजरी, मोसंबी, टरबूज, खरबूज, आंबा आदी पिकांच्या झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. तहसील प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुभाष मस्के, डॉ. आसाराम मराठे, दिनेश घोडके, दत्ता दाभाडे, संदीप राजगुरू, भास्कर गवते, सिद्धेश्वर काळे, शिवाजी काळे, बंडू घाटूळ, रमेश कोपडे, दत्ता समगे, पप्पू समगे, नंदकुमार पवार, राधाकिसन पवार, महेश कोकाट, रुद्रा घोलप, किशोर राजगुरू, राम गवते, मुकेश बोराडे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.