शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात सराईत गुन्हेगार अटकेत, जवळ आढळली २ गावठी कट्टे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:24 IST

दोन गावठी कट्यासह सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या! अंभोरा पोलिसांची केरूळ येथे कारवाई!

- नितीन कांबळेकडा (बीड) : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका एका सराईत गुन्हेगाराकडे दोन गावठी कट्यासह, एक काडतूस आढळून आले आहेत. कुमार दत्तू कांबळे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गावठी कट्टा आणि काडतूस ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री केरूळ येथे करण्यात आली.

अंभोरा पोलिसांना सोमवारी रात्री  गोपनीय माहिती मिळाली की, अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी कुमार दत्तू कांबळे ( रा.वरकुटी.ता.इंदापूर. जि.पुणे) हा आष्टी तालुक्यातील केरूळ येथे आहे. माहितीवरून पोलिसांनी केरूळ येथे छापा टाकला. येथे कुमार एका घरात अपहत मुलीसोबत आढळून आला. पोलिसांनी कुमार कांबळेस ताब्यात घेऊन झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे दोन गावठी कट्यासह, एक राऊंड मिळून आले. पोलिसांनी कांबळे यास अटक करून शस्त्र जप्त केले. याप्रकरणी पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात ४९/२५ आर्म ऍक्ट कलम ३, २५ नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीस इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सदरील कारवाई  पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे,शरद पोकळे,आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार मजरूद्दीन सय्यद, दिपक भोजे यांनी केली.

पिडीत मुलगी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात सराईत गुन्हेगार कुमार दत्तू कांबळे याने दहा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला तिच्या गावातून पळवून आणले होते. त्यावरून कुमार दत्तू कांबळेवर इंदापूर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. कांबळेस अटक केल्यानंतर पीडित मुलीस इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी