शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये खळबळ; उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, मग पतीने घेतला गळफास

By सोमनाथ खताळ | Updated: May 12, 2024 12:44 IST

भागवत हा रिक्षा चालक असून बीडमध्ये किरायाने घर करून कुटूंबासह रहात होता. शनिवारी रात्री तो घरी आला. यावेळी पत्नी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले.

बीड : आगोदर उशिने तोंड दाबून पत्नीचा खून करण्यात आला, नंतर स्वत: देखील दोरीने गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली. ही घटना बीड शहरातील वृंदावन काॅलनीत आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज असून पोलिस तपास करत आहेत.राधा वायभट (वय २६) व भागवत वायभट (वय ३५ दोघेही रा.लिंबागणेश ता.बीड ह.मु.बीड) अशी मयतांची नावे आहेत.

भागवत हा रिक्षा चालक असून बीडमध्ये किरायाने घर करून कुटूंबासह रहात होता. शनिवारी रात्री तो घरी आला. यावेळी पत्नी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. यामध्ये त्याने पत्नीला मारहाणही केली. त्यानंतर मध्यरात्रीच डोक्या खाली घेण्याच्या उशिने पत्नीचे तोंड दाबले. यामध्ये गुदमरून राधाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वत: देखील दरवाजा बाहेर असलेल्या हुकाला दोरीने गळफास घेतला.

सकाळी झोपेतून उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीने हा प्रकार पाहलिे. तीने रडायला सुरूवात केली. त्यामुळे खालच्या मजल्यावरील लोक वरच्या मजल्यावर गेले. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यावर शिवाजीनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते. हा वाद कौटुंबिक कारणावरून झाल्याचे समजत आहे. पाेलिस तपास करत असून खरे कारण काय, हे नंतरच समोर येणार आहे.