शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश साबळे विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:14 IST

माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांनी त्यांच्या राहत्या घराच्यामागे बाळासाहेब सोपान पौळ यांच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण केले. त्यांना गुंडामार्फत धमक्या देत जातीवाचाक शिवीगाळ केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून माजलगाव शहर पोलिसात शुक्रवारी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देन्यायालयाचे आदेश : प्लॉट विक्रीसाठी धमक्या देऊन केली होती शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांनी त्यांच्या राहत्या घराच्यामागे बाळासाहेब सोपान पौळ यांच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण केले. त्यांना गुंडामार्फत धमक्या देत जातीवाचाक शिवीगाळ केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून माजलगाव शहर पोलिसात शुक्रवारी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शहरापासून जवळच असलेल्या खानापुर येथील बाळासाहेब सोपानराव पौळ यांचे राहते घर आहे. त्यांच्या समोरील भागात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांचे हॉस्पिटल आणि घर आहे. पौळ हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांच्यावर १४ डिसेंबर २०१७ पासून १५ जानेवारी २०१८ पर्यंत वेळोवेळी अन्याय करण्यात येत होता. यातून पौळ यांनी त्यांचे राहते घर विक्री करावे, या हेतूने हा त्रास देण्यात येत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. याठिकाणी पौळ यांचे १३ व १४ नंबरचे प्लॉट असून त्यापैकी १३ नं. प्लॉटवर अतिक्रमण केले होते. पौळ आपणास प्लॉट देत नसल्याने वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. साबळे यांच्या रुग्णालयातील शस्त्रक्रियेनंतर निघालेली घाण, खराब पाणी व इतर औषधी साहित्य पौळ यांच्या प्लॉटमध्ये टाकले जात होते.याविषयी पौळ यांनी त्यांना विचारणा केली असता गुंडांना सोबत घेऊन डॉ. साबळे यांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

यावरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही डॉ. साबळेवर कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंदविला नाही. म्हणून फिर्यादी पौळ यांनी न्यायालयात धाव घेतली. १५ मार्च २०१८ रोजी अप्पर सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. साबळे यांच्या विरुद्ध भादवी कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ चे कलम ३(२)(४)(५)(१०)(१५) भादवीचे कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, न्यायालय आदेशाने १५६(३)सी आर पी सी प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके या करत आहेत.