लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील उमरी येथील जवान वसंत अभिमान मुळे (४०) यांचे कर्तव्यावर असताना गुरूवारी पंजाबमधील अमृतसर येथे अपघातात निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंत मुळे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. केज तालुक्यातील उमरी येथील मुळ रहिवासी आसलेले वसंत अभिमान मुळे हे पंजाब राज्यात सैन्य दलात सेवेत होते. गुरूवारी त्यांच्या जीपला अपघात झाला होता. यामध्ये ते जागीच ठार झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्र्थिव विमानाने शनिवारी सकाळी औरंगाबादला आनण्यात आले होते. शनिवारी दुपारी त्यांचे पार्थिव उमरी या त्यांच्या मूळ गावी पोहोचल्यानंतर काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर अडीच वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी उप विभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, आ.प्रा संगीता ठोंबरे, डॉ.विजयप्रकाश ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, तहसीलदार अविनाश कांबळे, गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, नंदकिशोर मुंदडा, माजी आ.पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा, भगवान केदार, दत्ता धस, प्रा.हनुमंत भोसले, महेश जाजू, ऋषिकेश आडसकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जवान वसंत मुळे यांच्यावर उमरीमध्ये अंत्यसंस्कार
By admin | Updated: July 2, 2017 00:34 IST