माजलगाव : ‘शेतकरी वाचवा, देश वाचवा’ या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून येथील तहसील कार्यालयसमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ.मुस्सदीक बाबा यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
२६ जून रोजी शेतकरीविरोधी तीन कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला सात महिने पूर्ण झाली आहेत. केंद्रातील मोदी सरकारने असंवैधानिक पद्धतीने लादलेले शेतकरी विरोधी हे तिन्ही काळे कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत, तोपर्यंत संयुक्त किसान मोर्चाचे हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे यावेळी कॉ.मुस्सदीक म्हणाले. यावेळी कॉ.सय्यद याकुब कॉ.सुहास झोडगे कॉ.दत्ता डाके यांनी मार्गदर्शन केले. धरणे आंदोलनात कॉ.बळीराम भुंबे, कॉ.संदिपान तेलगड, कॉ.शेख मेहबूब, कॉ.शेख मुस्तकीम, कॉ. रामा राऊत, कॉ.बाबा पवार, कॉ.बंडू गरड, कॉ. मदुकर आढागळे, कॉ. संजू गणगे, कॉ.अशोक राठोड, सय्यद फारुख, कॉ.सादिक पठाण, कॉ.संतोष जाधव, कॉ.ज्ञानेश्वर जाधव, कॉ.शेख चुंनु, कॉ.साहेबराव फुलगे, कॉ.विठ्ठल सक्राते, कॉ.सुदर्शन हिवरकर त्र्यंबक राऊत, संदिपान पाडमुख, कॉ.संतोष लेंगुळे, अश्रुबा गाढवे, ॲड.ए.एस. पठाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.
===Photopath===
260621\3757purusttam karva_img-20210626-wa0080_14.jpg