आरोग्य व महसूल प्रशासनाच्या वतीने हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये एक नोडल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सेस, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशयन, डाटा ऑपरेटर, वर्कर कार्यरत आहेत, अशी माहिती या सेंटरचे प्रमुख परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख यांनी दिली.
परळीच्या कोविड केअर सेंटरमध्ये आम्हाला दोन वेळा जेवण, अल्पोपाहार, काढा देण्यात येत असून रुग्णांची काळजी घेतली जात आहे. तसेच व्हिटॅमिनच्या गोळ्याही देण्यात येत आहेत. कोरोनाविषयी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. मास्क वापरा -निखिल तिळकरी, रुग्ण
परळीच्या कोविड केअर सेंटरमध्ये १९ मार्च रोजी पहिल्या दिवशी ५ रुग्ण दाखल करण्यात आले होते. रविवारी एकूण ६० जण होते. दहा दिवस उपचार केले जातात. येथे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण दाखल करून घेतले जात आहेत. तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्यांना लोखंडी सावरगाव येथील सेंटरमध्ये दाखल करण्यात येते -डॉ. अर्शद शेख, प्रमुख.
जीवनसत्वयुक्त आहार
कोविड केअर सेंटरच्या परिसरात स्वच्छता दिसून आली. येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वेळापत्रकानुसार रोज सकाळी मध, कोरफड ज्युस, ग्रीन टी ,पोहे, उपमा ,अंडी असा अल्पोपाहार, दुपारी जेवण, अद्रक चहा , रात्री जेवण , हळदीचे दूध देण्यात येते, तसेच व्हिटॅमिनच्या गोळ्याही दिल्या जातात. दोन वेळच्या जेवणात जीवनसत्वयुक्त पदार्थांमुळे रुग्णांना आधार झाला आहे.
===Photopath===
120421\img-20210411-wa0531_14.jpg