शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

बहीण-भावाचा खेळ अधुरा राहिला, छतात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 22:44 IST

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील घटना

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव: तालुक्यातील टालेवाडी येथील दोन चिमुकले छतावर चढत असताना छतामध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे चुलत बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

माजलगाव -- तेलगाव रस्त्यावर असलेल्या टालेवाडी येथील साक्षी भारत बडे वय 12 वर्षे व सार्थक अशोक बडे वय 8 वर्षे हे भरत बडे यांच्या घरात खेळत असतांना छतामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने या दोघा सख्या चुलत बहिण-भावाचा मृत्यू  झाला असल्याची घटना दुपारी घडली असावी असा अंदाज त्यांच्या घरच्यांनी वर्तवला आहे.

यांच्या घराच्या बाजूला असलेल्या  डीपी वरून मागील अनेक वर्षापासून करंट उतरत असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत गावातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी कळवुन देखील त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. शनिवारी दुपारी हे दोघे चिमुकली बहिण भाऊ खेळत असताना त्यातील सार्थक हा छतावर जाण्यासाठी चढत असताना त्याला शॉक लागला असावा व त्यानंतर साक्षी ही त्याला पाहायला गेली असता तिला देखील करंट लागल्याने हे दोघे एकमेकांच्या अंगावर पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सदरील डीपीवरून करंट उतरल्यास या भागात असलेल्या 40 ते 50 घरांमध्ये करंट उतरतो व या करंट मुळे घरातील पंखे व बल्प ऑटोमॅटिक  फिरत असल्याचे गावकरी सांगताना दिसत होते. या दोघांना माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोघांवर रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांच्या मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड