शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून नवदाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:47 IST

आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी येथील तलावात नवदाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी येथील तलावात नवदाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.लहानू विलास साळुंके (२३) व छाया लहानू साळुंके (१९ रा. सारोळा शुध्दी जिल्हा अहमदनगर) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. ते आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी येथील मोहन भिकाजी गायकवाड या आजी आजोबाकडे भेटायला आले होते. आजीला मदत व्हावी म्हणून छाया धुणे धुण्यासाठी येथून जवळच असलेल्या सोनीपठार शिवारातील तलावावर गेले होते. छायासोबत पतीही गेला होता. त्यांच्यासोबत एक लहान मुलगीपण होती. कपडे धुताना छायाचा पाय घसरून ती पाण्यात पडली. हा प्रकार लहानूने पाहिला. त्याने तात्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र पाणी खोल असल्याने आणि छायाने मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.हा सर्व प्रकार पाण्याबाहेर असलेली चिमुकली मुलगी पहात होती. हे दोघेही बाहेर येत नसल्याने ती जोरात रडू लागली. परिसरातील लोकांनी धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अंभोरा पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.सहा महिन्यांपूर्वीच विवाहछाया व लहानू यांचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड पे्रम होते. कोठेही जाताना दोघे सोबतच असायचे. रविवारीही ते सोबतच गेले होते. छायाला वाचविताना दोघांचाही बुडून मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढले त्यावेळी दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली दिसून आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू