शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : राज्यातील सहा जिल्ह्यांतील ६० गावांमध्ये होणार ‘सेरो सर्व्हे’;नागरिकांमधील अँटीबॉडीजचे प्रमाण कळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 13:31 IST

मे २०२० मध्ये राज्यातील सहा जिल्ह्यांत भारतीय आयुर्विज्ञान संसाधन परिषदेच्या वतीने सेरो सर्व्हे करण्यात आला होता.

ठळक मुद्देबीड, परभणी, नांदेड, अहमदनगर,जळगाव, सांगलीचा समावेशया सर्वेक्षणात टेस्ट केलेल्या लोकांची वय, लिंगानुसार तपासणी केली जाणार आहे.

बीड : कोरोनासंदर्भात नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी ‘आयसीएमआर’कडून २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान ‘सेरो सर्व्हे’ केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, जळगाव व सांगली अशा ६ जिल्ह्यांतील ६० गावांची निवड केली आहे. 

मे २०२० मध्ये राज्यातील सहा जिल्ह्यांत भारतीय आयुर्विज्ञान संसाधन परिषदेच्या वतीने सेरो सर्व्हे करण्यात आला होता. यात या सहा जिल्ह्यांतील १५९३ लोकांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या होत्या. यात २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. टक्केवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक १.५१ लोकांना याची लागण झाल्याचे समजले होते. तर सर्वात कमी ०५ टक्के हा जळगाव जिल्ह्याचा आकडा होता. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत याची माहिती घेऊन कोरोनाचा अंदाज घेतला होता. आता पुन्हा राज्यातील याच जिल्ह्यात सेरो सर्व्हेचा दुसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे.   

अ‍ॅटॅक रेटही काढण्यात येणारया सर्वेक्षणात टेस्ट केलेल्या लोकांची वय, लिंगानुसार तपासणी केली जाणार आहे. त्याद्वारे कोरोनाचा अ‍ॅटॅक रेटही काढण्यात येणार आहे. मागच्या सर्वेक्षणात ही माहिती नव्हती. यासंदर्भात सोमवारी राज्यातील सर्वच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाºयांना याची माहिती देण्यात आली आहे. त्या दृष्टीने या जिल्ह्यांतील ६० गावांत तयारी करण्यात येत आहे. 

या ६० गावांत होणार सर्व्हे- अहमदनगर जिल्हा : केळूगाव, कासारडुमाळा, नांदूरखिख, मडकी, शेवगाव, कौडगाव, वासुंदे, माढेवडगाव, संगमनेर वॉर्ड क्र. १७, अहमदनगर  वार्ड क्र. २७- जळगाव जिल्हा : मोहराळे, तांदळवाडी, काडगाव, धरणगाव ग्रामीण, वारखेड, नाईकनगर, गोरदखेडे, भुसावळ वॉर्ड ४५, जळगाव ५७, चाळीसगाव २८- सांगली जिल्हा : केदारवाडी, फारनेवाडी (शिगाव), अमरापुर, चिंचाळे, दुधगाव, लिंगणूर, माडगयाळ, आष्टा वॉर्ड ५, सांगली मिरजकुपवाड वॉर्ड २३ व ६७- बीड जिल्हा : हिंगणी, पांगरी, आमला, तळेवाडी, पिंपळनेर, चंदणसावरगाव, मोहा, नांदगाव, बीड वॉर्ड २३, परळी वॉर्ड ३०- नांदेड जिल्हा : रूपनाईक तांडा, पावना, अमराबाद तांडा, राहतीक (साजा), कहाला बीके, रामतिर्थ, होकर्णा, हाणेगाव, नांदेड वाघाळा वॉर्ड ३८, बळीरामपुर वॉर्ड १, - परभणी जिल्हा : खाणवे पिंपरी, भोगाव, ताडलिंबा, किन्होळा बीके, नाईकोटा, फरकांडा, कान्हेगाव, परभणी ५ व ४०, सोनपेठ वॉर्ड १७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस