शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

CoronaVirus : लढेंगे और जितेंगे भी; बीडमध्ये कोव्हीडच्या १०० खाटांमागे ८८ योद्धे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:53 IST

बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात २०० खाटा, अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात २५० खाटा, लोखंडी सावरगाव, केज आणि परळी येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्वतंत्र कोव्हीड रुग्णालये तयार

ठळक मुद्देकोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्जपाच स्वतंत्र रुग्णालयांत डॉक्टर, परिचारीका, कक्ष सेवक आदींचा समावेश

बीड : कोरोनाविरूद्ध लढा देण्यात आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात पाच स्वतंत्र रुग्णालये तयार केले आहेत. याची एकूण क्षमता ७५० खाटांची आहे. १०० खाटांमागे ८८ योद्धा कर्तव्य बजावणार आहेत. यात २० डॉक्टर, ४६ परिचारीका आणि २० कक्ष सेवक, २ औषध निर्माण अधिकारी, १ नोडल अधिकारी व एक डाटा एन्ट्री आॅपरेटर असा यांचा समावेश आहे. लवकरच ही रुग्णालये सेवेत सुरू केली जाणार आहेत.

बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात २०० खाटा, अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात २५० खाटा, लोखंडी सावरगाव, केज आणि परळी येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्वतंत्र कोव्हीड रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी लागणारे सर्व साधन सामग्री आणि साहित्य उपलब्ध केले आहे. तसेच एका रुग्णालयात १०० खाटांसाठी ८८ लोकांची स्वतंत्र टिम तयार केली आहे. हे सर्व लोक जीव धोक्यात घालून कोरोना संशयित अथवा कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी लढा देणार आहेत. तीन दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने सर्व कोव्हीड रुग्णालयांची तपासणी केली आहे. कामाबद्दल समाधानही व्यक्त केले होते. थोड्याफार त्रुटींबद्दल मार्गदर्शनही केले होते. आता अवघ्या आठवडाभरात हे रुग्णालये सेवेत पूर्णपणे उपलब्ध होणार आहेत. डॉ. सुखदेव राठोड, डॉ. अशोक हुंबेकर, डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. राम देशपांडे, डॉ. बाबासाहेब ढाकणे, डॉ. महेश माने, डॉ. जयश्री बांगर, डॉ. सचिन आंधळकर आदींची टीम कोव्हीडसंदर्भात नियोजन करीत आहे.

२० खाटांचा आयसीयू कक्ष१०० पैकी २० खाटांचा आयसीयू कक्ष तयार केला जाणार आहे. इतर ८० खाट (कोरोनाशी संबंधितच) हे इतर रुग्णांसाठी असणार आहेत. या कक्षात ६ वैद्यकीय अधिकारी आणि एका खाटामागे एक  परिचारीका असणार आहे. इतर रुग्णांसाठी चार खाटांमागे १ परिचारीका असणार आहे. तसेच अतिदक्षतामधील दोन खाटांमागे एक कक्ष सेवक तर इतर खाटांसाठी आठ मागे एक कक्ष सेवक असणार आहे. याबाबत मार्गदर्शक सुचना उपसंचालकांनी दिल्या आहेत.

कोव्हीड रुग्णालयातील १०० खाटांसाठी स्वतंत्र स्टाफची नियूक्ती केलेली आहे. मार्गदर्शक सुचनांनूसार सर्व कार्यवाही केली जाईल. डॉक्टर, परिचारीका, कक्षसेवक, औषधनिर्माण अधिकारी, नोडल आॅफिसर, डाटा एन्ट्री आॅपरेटर हे या कोव्हीड रुग्णालयात कर्तव्य बजावतील. लवकरच हे सेवेत दिसतील.- डॉ.अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड