शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 'धन्यवाद आणि शुभेच्छा'; बीड जिल्ह्यात एकाचवेळी कोरोना योद्धयांनी एकमेकांनाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:30 IST

बुधवारी सकाळी १० वाजता सर्वांनी आहे त्या ठिकाणीच सोबतच्या सहकाऱ्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्देबीड आरोग्य विभागाची आदर्श संकल्पना

- सोमनाथ खताळ

बीड : कोरोना लढ्यात सर्वांनीच काम उत्कृष्ट केले. त्यामुळे प्रत्येकाने आज सकाळी १० वाजता एकाचवेळी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एकमेकांच्या कामाचे कौतुक केले. आपले कौतूक झाल्यानंतर धन्यवाद मानून समोरच्यालाही शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाने हा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करण्यास आणखी बळ मिळाले आहे. 

जिल्ह्यात आशा, अंगणवाडी सेविकांपासून ते जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यापर्यंत सर्वच यंत्रणा दिवसरात्र जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या या कामाला सर्वस्तरातून सलाम करण्यात आला. असे असले तरीही आपणही एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. याच उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी एकाचवेळी सर्वांनी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी १० वाजताची वेळ ठरविली. सर्वांनी एकत्र न येता ज्या ठिकाणी आहे, तेथेच एकमेकांच्या कामाचे कौतूक करून शुभेच्छा द्याव्यात. फुल देऊन एकमेकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करावी. 

याबाबत सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आशा, अंगणवाडी सेविका यांना सुचना करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच बुधवारी सकाळी १० वाजता सर्वांनी आहे त्या ठिकाणीच सोबतच्या सहकाऱ्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. आपल्यातली आपल्यात कृतज्ञता व्यक्त करून उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने ही संकल्पना राबविली. ही संकल्पना नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून लढण्यासाठी उर्जा मिळणार आहे.

राजुरीत डीएचओंकडून सत्कारज्या त्या तालुक्यात, गावात, कार्यालयात एकमेकांनी सत्कार केला. सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी उत्साहाने या संकल्पनेला प्रतिसाद दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी बीड तालुक्यातील राजुरी आरोग्य केंद्रात जावून अधिकारी, कर्मचाºयांचा सत्कार केला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नरेश कासट, वैद्यकिय अधिकारी डॉ बेग, डॉ दत्तात्रय राऊत यांच्यासह परिचारिका, आशा आदींची उपस्थिती होती .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड