शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : त्यांना सांगावे...३ मेपर्यंत गावाबाहेरच रहावे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 19:11 IST

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील ७०० सरपंचांसोबत व्हीसीद्वारे संवाद साधला. 

बीड : बाहेरील गावचे अथवा गावातील बाहेरगावी असलेल्या व्यक्तीला गावात येऊ देऊ नका, ३ मेपर्यंत तिकडेच थांबायला सांगा अशी सूचना देत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील ७०० सरपंचांसोबत व्हीसीद्वारे संवाद साधला. 

कोरोना आपत्ती व्यवस्थापनात सर्वच यंत्रणा कार्यरत आहेत. सोशल डिस्टन्सिंग तसेच गावपातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून शासन व प्रशासनाच्या नियमांचे पालन ग्रामस्थांच्या सहभागातून केले जात आहे. गावचा सरपंच हा महत्वाचा घटक आहे. त्यांच्याशी संपर्क साधून दिलेल्या दशसूत्रीचे पालन करण्याबरोबरच अन्य विषयांवर चर्चा करुन सीईओ कुंभार यांनी मार्गदर्शन केले. 

बुधवारी अंबाजोगाई, परळी. माजलगाव, शिरुर, पाटोदा, आष्टी, गेवराई येथील सरपंचांशी संवाद साधण्यात आला. यावेळी सरपंचांच्या अडचणींना उत्तरे देत समाधान केले.  कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिलेल्या दशसुत्रीचे सर्व ग्रामपंचायतींनी पालन करावे. बाहेरील गावचे अथवा गावातील जे लोक बाहेरगावी आहेत, त्यांना गावात येऊ देऊ नका. ३ मेपर्यंत तिकडेच थांबण्यास सांगावे, असे कुंभार म्हणाले

गावात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर देखरेखीसाठी ग्रामसुरक्षा समिती त्वरित स्थापन करावी. गावभेटीचे रजिस्टर करुन रोज सर्व नोंदी घ्याव्यात. गावातील नागरिकांना मुलभूत गरजा सोडवाव्यात तसेच कुठलाही राजकीय, धार्मिक भेदभाव मनात न ठेवता सर्वांना मदत करण्याची सूचना सीईओ कुंभार यांनी दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी उपस्थित होते. 

उपाययोजनेबाबत सीईओंच्या सूचना गावाला जोडणारे रस्ते, कोणत्याही परिस्थितीत खोदू नयेत किंवा दगड, कोटे टाकून बंद करु नयेत. यामुळे जीवनावश्यक गरजा पोहचविणे तसेच आरोग्य सुविधा पोहचविण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे या दृष्टीने उपाय करण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्या. 

दोन दिवस संवादातून संपर्ककोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्यातील ७५० तसेच गुरुवारी २५० सरपंचांशी सीईओंनी व्हिसीद्वारे संपर्क साधून एकूण परिस्थितीचा आढावा घेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत माहिती देत सरपंचांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड