शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : धक्कादायक ! बीडमध्ये निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची इमारत प्रतिबंधित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:11 IST

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह त्या इमारतीतील सर्व विभाग बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

ठळक मुद्देकार्यालयात काम करणाऱ्या शिपायाची पत्नी पॉझिटिव्हदुपारनंतर सर्व विभाग बंद

बीड : बीड जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाची पत्नी पॉझिटिव्ह आल्यामुळे पूर्ण इमारत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रतिबंधित क्षेत्र केले आहे. याबाबतच्या सूचना त्यांनी सोमवारी दिल्या आहेत. त्यामुळे दुपारपासून कार्यालयातील सर्व विभाग अचानक बंद ठेवावे लागले. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाची पत्नी परजिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याच्या संशयावरुन खबरदारीचा उपाय म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह त्या इमारतीतील सर्व विभाग बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. त्यानंतर अचानक विभाग बंद केल्यामुळे कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांची गैरसोय झाली. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील शिपायाचा कोरोना चाचणीसाठी नमुना प्रयोगशाळेकडे पाठविला आहे. सोमवारी उशिरा किंवा 22 जुलै रोजी प्राप्त होणार्‍या अहवालावर निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य विभाग खुले करणार की बंद ठेवणार हा निर्णय होणार आहे.

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरुन प्रतिबंधित क्षेत्र करण्याची कार्यवाही करण्यात आली. संपर्कातील व्यक्तीचा कोरोना चाचणीसाठी नमुना पाठविला आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील आवश्यक ती कार्यवाही करु.-मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड