शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : धक्कादायक ! सार्वजनिक स्मशानभूमीतील कोरोनाबाधिताचा अंत्यविधी नागरिकांनी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:11 IST

बोरुळा स्मशानभूमीत कोरोना मयतांचे अंत्यसंस्कार नको, पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितलेबोरुळा स्मशानभूमीत अंत्यविधिस नागरिकांचा विरोध

अंबाजोगाई : शहरातील बोरुळा तलाव स्मशानभूमीत आज संतप्त नागरिकांनी कोरोनाबाधित व्यक्तीचा अंत्यविधी रोखला आहे. कोरोना मयतांसाठी प्रशासनाने स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

अंबाजोगाईत नागरी वस्तीत असलेली बोरूळ स्मशानभुमी सार्वजनिक असून शहरातील ७० टक्के अंत्यविधी या ठिकाणी होतात. दहाव्याचे कार्यक्रम देखील नियमित सुरु असतात. येथील तलावावर कपडे धुण्यासाठी आजूबाजच्या महिलांची सतत वर्दळ असते.  तसेच, हे ठिकाण स्वाराती रूग्णालयापासून ३ किमी अंतरावर असून या ठिकाणी मृतदेह आणण्यासाठी गावातून वर्दळीच्या रस्त्याने यावे लागते. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोरोना मयत रुग्णांवर अंत्यसंस्कार करू नयेत अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीच केली होती. त्यानंतरही गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहरातील व्यक्तीवर बोरूळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरु झाली. याला विरोध करत उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, सारंग पुजारी, अमोल लोमटे, सामाजिक कार्यकर्ते ॲड.‌ संतोष लोमटे, बाला पाथरकर, अशोक जेधे आणि इतर नागरिकांनी स्मशानभूमीत जमा होत अंत्यसंस्कार रोखले. बोरुळा स्मशानभूमीत नियमित असे अंत्यविधी होऊ लागले तर त्यातून प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी कोरोना मयतांचे अंत्यविधी करू नयेत, त्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

‌▪ स्वाराती रुग्णालय परिसरात व्यवस्था करा :

स्वाराती रूग्णालयाच्या शवगृहाजवळच मोठे खुले मैदान आहे. या ठिकाणी तात्पुरते शेड उभा करून कोरोना मयतांचे अंत्यविधी तिथेच करावेत अशी मागणी यापूर्वीच नगरसेवक शेख रहीम, सारंग पुजारी ॲड.‌ संतोष लोमटे यांनी मुख्याधिकार्यांकडे केली होती. उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे यांनी देखील स्वाराती रुग्णालय परिसरात तात्पुरती स्मशानभूमी उभारण्याचा मुद्दा  सभागृहात मांडला होता. 

‌▪‌ पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु :

“कोरोना प्रभावित मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच स्वाराती रुग्णालय परिसरात अंत्यविधीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल. सर्व नियमांचे काटेकोर पालन करून अंत्यविधी होतील.”-शोभा जाधव, उपविभागीय कार्यकारी अधिकारी, अंबाजोगाई.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड