शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ग्रामीण भागात रॉकेल मिश्रीत पेट्रोलची दुप्पट भावात विक्री; बीडमध्ये व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 19:13 IST

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

ठळक मुद्देइंधनाचा काळा बाजार उघडकीसखाजगी वाहने रस्त्यावर आल्याने वाढली गर्दी

माजलगाव : जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवा,प्रसार माध्यम व प्रशासनास पेट्रोल व डिझेल ची विक्री करण्याची परवानगी असताना तालुक्यात विविध ठिकाणी टपरी,किराणा दुकानवर 150 रु लिटर ने पेट्रोल व डिझेल ची विक्री केली जात असल्याचा प्रकार एका युवकाने माऊली फाटा ता माजलगाव येथे आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळें एकच खळबळ उडाली आहे.पोलीस व प्रशासनाचे याकडे मात्र लक्ष नाही.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त रस्त्यावर कोणी ही दिसू नये म्हणून जिल्हाधिकारी  यांनी सर्वसामान्य माणसास पेट्रोल विक्री वर बंदी घातली आहे. याच गोष्टीचा फायदा घेत काही लोकांनी पेट्रोलचा काळाबाजार सुरू केला असून अशा विक्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

नागरिकांना फळभाज्या मिळाव्यात म्हणून ग्रामीण भागातून फळ भाजीपाला, दूध,जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी त्यांना पेट्रोल मिळावे म्हणून पास देण्यात आल्या आहेत. मात्र काही पेट्रोल पंप चालक मात्र प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत  काळाबाजार करून इंधन विक्री करणाऱ्यांना  पेट्रोल देत आहेत. यातूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.         व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण सदरील पेट्रोल विक्री करणाऱ्यास पेट्रोल मध्ये रॉकेल मिक्स केल्यामुळे त्याची गाडी बंद पडली असल्याने जाब विचारत आहे. तसेच पेट्रोल 150 रु ने विकत घेतल्याचे ही बोलत आहे.त्याच वेळी दुसऱ्या दुचाकीस्वारास ही त्या ठिकाणी पेट्रोल विक्री होत असल्याचे दिसून येते. या व्हिडीओमुळे इंधनाचा काळाबाजार उघड झाला असून प्रशासनाने पेट्रोल विक्री करणाऱ्यासह त्याला पेट्रोल देणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

नियमबाह्य पेट्रोल विक्री करणाऱ्या सदर व्यक्तीला सापडुन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.-- डॉ. प्रतिभा गोरे , तहसीलदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड