शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : बीडकरांना दिलासा; खाजगी डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह ११६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:49 IST

पाटोदा तालुक्यातील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील नागरिकांचे अहवाल

बीड : पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बीड शहरातील खाजगी डॉक्टर, कर्मचारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी पाठविलेल्या ११८ पैकी ११८ स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २ प्रलंबित आहेत. या निगेटिव्ह अहवालांमुळे बीडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कारेगाव येथील रुग्ण बीडमधील दोन खाजगी रुग्णालये आणि एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तपासणीसाठी गेला होता. त्यामुळे त्याचा डॉक्टर, कर्मचाºयांशी संपर्क आला होता. तसेच एका रुग्णालयात तो चार दिवस अ‍ॅडमिट होता. त्यामुळे अ‍ॅडमिट असलेल्या इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबतही अप्रत्यक्ष, प्रत्यक्षरित्या संपर्क आला होता. आरोग्य विभागाने सर्वांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून शुक्रवारी त्यांचे स्वॅब घेतले. जिल्ह्यातून ११८ स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. पैकी ११६ निगेटिव्ह आले असून २ प्रलंबित आहेत. 

दरम्यान, जिल्ह्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या ६१ आहे. पैकी पाच कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. ६ रुग्ण पुण्याला उपचारासाठी गेल्याने बीडमध्ये ४९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड