शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

CoronaVirus : थेट भाजीपाला विक्रीत शेतकऱ्यांना अडचणी; धनंजय मुंडेंनी 'असा' दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:30 IST

भाजीपाला विकत घेऊन गैरसोय केली दूर, नंतर शहरात गरजूंना मोफत वाटप केला

ठळक मुद्देशेतकरी ते ग्राहक थेट विक्री बारगळनार? शेतकऱ्यांची ना धनंजय मुंडेंकडे धाव!

परळी (संजय खाकरे) : शहरातील भाजीपाला विक्री चे   बीट बंद असल्याने ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादकांची तारांबळ उडत आहे, तालुक्यातील जवळपास १००  भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी  शहरात  गैरसोय झाल्याने  पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाकडे शुक्रवारी  सकाळी धाव घेतली.

धनंजय मुंडे यांनी तात्काळ या सर्व शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना  आधार दिला आहे. ना. मुंडेंनी  अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा भाजीपाला त्यांच्या 'नाथ प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेमार्फत विकत घेतला असून तो नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकरवी शहरातील गरजू नागरिकांना मोफत वाटप केला आहे.

परळीत फळे व भाजीपाला सुरळीत पुरवठा करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बुधवार पासून सुरू करण्यात आली  आहे ,काही शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जास्त प्रमाणावर आहे, अशा शेतकऱ्यांना दररोज तो शहरात आणून गल्लोगल्ली फिरून विकणे शक्य होत नाही, तसेच काही शेतकरी/व्यापारी वयोवृद्ध असल्यामुळे त्यांनाही फिरून विकण्याची अडचण होते, शिवाय बऱ्याच जणांना विकण्यासाठी वाहनांची अडचणही आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी ना. मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाकडे धाव घेत आपली कैफियत मांडली. 

काही शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्याच्या कडेला बसून विकण्याबाबत परवानगी मागितली आहे तर काहींनी भाजीपाला ठोक विक्रीचे बीट सुरू करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ असेही ना. मुंडे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना यावेळी सांगितले.

सबंध जिल्ह्यासाठी भाजीपाला विक्रीसाठी घालून दिलेले नियम व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांच्या आत निर्णय घेऊ, कोणत्याही स्वरूपात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी ना. मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

यावेळी  परळी तहसीलदार विपिन पाटील ,नायब तहसीलदार बाबूराव रुपनर ,,नपचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे व इतर अधिकारी, शेतकरी व व्यापारी,नगरसेवक  उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या बैठकीसह ना. मुंडे यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत विशेष खबरदारी घेतल्याचेही दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड