शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाच्या सावटाने आंबा झाला 'लॉक'; अक्षय तृतीया होणार पुरणपोळीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:35 IST

लॉकडाऊनमुळे आंब्याची आवक नाही; संचारबंदीत अडकला गावरान अंबा

ठळक मुद्देखेड्यापाड्यातुन येणारा गावरान व इतर राज्यातुन येणारा आंबाही संचारबंदीत अडकलाकर्नाटक , आंध्रप्रदेश , पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून होणारी आंब्याची आवक ठप्प

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : चार दिवसावर येऊन ठेपलेल्या अक्षय तृतीयाला आंब्याचे अनन्यसाधारण महत्व असले तरी, यावर्षी कोरोनाच्या धर्तीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारातून आंबा गायब झाला आहे. खेड्यापाड्यातुन येणारा गावरान व इतर राज्यातुन येणारा आंबाही संचारबंदीत अडकल्याने यंदाची अक्षय तृतीया पुरणपोळीवरच साजरी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.             हिंदू धर्मात साजऱ्या करण्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला एक आगळेवेगळे महत्व असते. गुढीपाडव्याला हिंदू वर्षाची सुरुवात झाल्यानंतर येणारा अक्षय तृतीय हा पहिलाच सन असून साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने सोन्यासह अन्य वस्तूंची मोठी खरेदी यादिवशी नागरिकांकडून करण्यात येते. नवीन वाहन खरेदी, नवीन वास्तूत गृह प्रवेश यादिवशी शुभ मानले जाते. याचदिवशी दिवंगत आई, वडिलांना नैवद्य देऊन पित्र, सुवासानीला आमरस, पुरणपोळीचे जेवण करण्यात येते. अक्षय तृतीयाला आंब्याचे अनन्यसाधारण महत्व असल्याने नागरिकांकडून यादिवशी आंब्याची मोठी खरेदी करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मालवाहातुकीसह सर्व व्यवहार, बाजारपेठा बंद आहेत.

 यामुळे कर्नाटक , आंध्रप्रदेश , पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून होणारी आंब्याची आवक ठप्प झाल्याने बाजारात आंबा दिसेनासा झाला आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्याने तालुक्यात एकदिवसाआड सकाळी सात ते साडेनऊ या केवळ अडीच तासातच शिथिलता ठेवण्यात आली आहे. प्रशासनाने रस्त्यावर, बाजारात बसून फळविक्रीला बंदी घातल्याने यावर्षी आंबा खरेदी करणे दुरापस्त झाले आहे. यामुळे अक्षय तृतीयाला आंब्याचे महत्व असले तरी, कोरोनामुळे यावर्षीची अक्षय तृतीय आंब्याविनाच साजरी करण्याची मानसिकता नागरिकांनी ठेवली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडMangoआंबा