शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

CoronaVirus : राशनकार्ड धारकास कमी धान्य दिले; लहुरीच्या स्वस्तधान्य दुकानाचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 19:26 IST

नागरिकाने केली थेट अन्न पुरवठा मंत्र्याला तक्रार

- दीपक नाईकवाडे केज : तालुक्यातील लातूर येथील स्वस्त धान्य दुकानदाराने रेशनकार्ड धारकास नियमाप्रमाणे स्वस्त धान्य न देता इपॉस मशीनवर नियमाप्रमाणे धान्य दिल्याची नोंद स्वतःचे आधार प्रामाणिकरण करून केली होती या प्रकरणी रेशनकार्ड धारकाने याबाबत  अन्न पुरवठा मंत्री व प्रधानसचिव यांच्याकडे लेखी तक्रार होती या तक्रारीची चौकशी करून अखेरीस जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. या बाबत लोकमत मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

केज तालुक्यातील बहुतांश  स्वस्त धान्य दुकानदार  रेशनकार्ड धारकांना शासनाकडून नियमाप्रमाणे मानसी येणाऱ्या धान्याचे वितरण न करता ते कमी प्रमाणात वितरण करत असल्याचे प्रकार सर्रास पणे चालू आहेत असाच प्रकार तालुक्यातील लहुरी येथील स्वस्त धान्य दुकानदार डी  टी चाळक  यांनी केला त्यांच्याकडे रेशनकार्ड असलेले अशोक रामभाऊ चाळक  हे स्वस्त धान्य आणण्यासाठी स्वस्तधान्य दुकानावर गेले असता त्यांना स्वस्तधान्य दुकानदाराने नियमाप्रमाणे येणारे तीस किलो गहू व वीस किलो तांदूळ देण्या ऐवजी त्यांना अठरा किलो गहू व दहा किलो तांदूळ देत बारा किलो गहू व दहा किलो तांदूळ कमी दिला मात्र दिलेल्या स्वस्त धान्याची नोंद इपॉस मशीनवर मात्र अशोक चाळक यांना तीस किलो गहू व वीस किलो तांदूळ दिल्याची  नियमाप्रमाणे नोंद स्वतःचे आधार प्रमाणीकरण करून केली.

अशोक चाळक यांनी दुकानदारास नियमाप्रमाणे धान्याची मागणी करूनही धान्य न दिल्याने त्यानी याची तक्रार अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ व अन्न पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली होती त्यांनी याची गंभीर दखल घेत सदरील स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीचे आदेश दिल्या नंतर सदरील दुकानाची केज तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी तलाठी वाघमारे यांच्या मार्फत चौकशी केली असता सदर स्वस्तधान्य दुकानदार यात दोषी आढळून आला तसा अहवाल तलाठी वाघमारे यांनी दिल्या नंतर तहसीलदारानी सदर   दुकानावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे पाठवला होता त्या नुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लहुरी येथील डी टी चाळक यांच्या नावे असलेल्या स्वस्तधान्य दुकानाचा परवाना निलंबित केला असल्याचे आदेश अखेर पारित केले आहेत . दरम्यान रेशनकार्ड धारकास कमी धान्य देणे अखेर स्वस्तधान्य दुकानदारास महागात पडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड