शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

CoronaVirus : चेकपोस्टवरील प्रामाणिक कर्मचारी टेंशन फ्री; कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 19:45 IST

कोरोनाग्रस्तांचा बीड पोलीस व शहागड आणि चौसाळा चेकपोस्टवरील पथकाशी संपर्क आला होता.

ठळक मुद्देसर्वच कर्मचारी झाले चिंता मुक्त

बीड : लातूर येथे शनिवारी आठ लोक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यांनी दोन जीपमध्ये बीड जिल्ह्यातून प्रवेश केल्याने त्यांचा बीड पोलीस व शहागड आणि चौसाळा चेकपोस्टवरील पथकाशी संपर्क आला होता. अशा २९ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये रविवारी दाखल केले होते. आज दुपारी त्यांचे अहवाल आले असून सर्वच निगेटिव्ह आहेत. कोरोनाशी लढा देणा-या कर्मचा-यांच्या प्रामाणिक कर्तव्याचा हा विजय आहे. इतर अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. 

आंध्रप्रदेशमधील आठ लोक ३१ मार्च रोजी रात्री दोन जीपमधून शहागड येथे आले. त्यांना चेकपोस्टवरून प्रवेश नाकारला. त्यांनी कर्तव्यावरील  पथकासोबत हुज्जत घातली. तरीही प्रवेश न मिळाल्याने ते शहागडमध्येच मुक्कामी थांबले. सकाळी सात वाजता ते पुन्हा चेकपोस्टवर आले. तरीही प्रवेश नाकारला. नंतर त्यांनी नागझरीमार्गे बीडमध्ये प्रवेश केला. नंतर चौसाळा चेकपोस्टवरही त्यांची तपासणी केली. पुढे ते तुळजापूर, उमरगा मार्गे निलंगा येथे गेल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, लातूरमध्ये त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह येताच बीडची यंत्रणा सतर्क झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू केले. बीडमध्ये कोठेच न थांबल्याने इतर लोकांशी संपर्क आला नाही. परंतू चेकपोस्टवर त्यांचा संपर्क आला होता. त्यामुळे शहागड व चौसाळा चेकपोस्टवर कर्तव्यावर असणारे पोलीस, आरोग्य व शिक्षक असे २९ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून सर्वच निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ९८ लोकांचा अहवाल पाठविलेला आहे. सर्वच अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अन् त्यांच्या चेह-यावर दिसले हास्यप्रशासनाने नेमून दिलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडताना न कळत कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला. आता आपल्यलााही आयसोलेट केल्याने पोलीस, आरोग्य व शिक्षक घाबरले होते. रात्रभर त्यांना अहवालाची चिंता होती. परंतु सर्वच निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांच्या चेह-यावर हास्य फुलल्याचे दिसले. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह येण्यासह यापुढे जिल्ह्यात एकही रुग्ण  पॉझिटिव्ह आढळणार नाही, यासाठी बीडकर प्रार्थना करताना दिसत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड