शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘होम क्वारंटाईन’ लोक घराबाहेर पडताच वाजणार घंटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 13:26 IST

पुरावा दाखविणाऱ्या ‘होम क्वारंटाईन मॉनिटरींग अ‍ॅप’ची केली निर्मिती

ठळक मुद्देआरोग्य विभाग झाला ‘अपडेट’ मोबाईलच्या मदतीने ठेवणार लक्ष

 

- सोमनाथ खताळबीड : कोरोना संशयितांना आरोग्य विभागाकडून होम क्वारंटाइन केले जात आहे. त्यांच्यावर यंत्रांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. एखादा व्यक्ती क्वांरटाईन असतानाही घराबाहेर पडला तर अवघ्या सेकंदात नियंत्रणात कक्षात ‘घंटी’ (सुचना) वाजणार आहे. आणि मोबाईल घरात ठेवून बाहेर आल्यास गावातील टीम लक्ष ठेवेल. यासाठी आरोग्य विभागाने ‘होम क्वारंटाईन मॉनिटरींग अ‍ॅप’ची निर्मिती केली आहे. पूर्वीचे लाईफ ३६० हे अ‍ॅप बंद केले जाणार आहे.

विदेशासह परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची चेकपोस्टवर नोंद घेऊन तपासणी केली जाते. तसेच त्यांना १४ दिवसांसाठी घरातच अलगीकरण केले जाते. तरीही काही लोक बाहेर  पडत असल्याचे लक्षात आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य विभागाला अपडेट करीत यंत्रांची मदत घेतली. जे लोक क्वारंटाईन केले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये ‘होम क्वारंटाईन मॉनिटरींग अ‍ॅप’ कार्यान्वित केले आहे. याला घराची सिमा दिली आहे. याचे नियंत्रण प्रत्येक तालुक्यातील स्वतंत्र कक्षात केले जात आहे. घराची सिमा ओलांडून एक पाऊलही घराबाहेर टाकल्यास नियंत्रण कक्षात सुचना मिळणार आहे. अवघ्या सेकंदात संबंधित व्यक्तीला संपर्क करून एक समज दिली जाईल. त्यानंतरही तो बाहेर  पडल्याचे दिसल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

दरम्यान, एखाद्याने डोके लावून जीपीएस बंद केले किंवा मोबाईल घरात ठेवत बाहेर आल्यास त्याच्यावर नजर ठेवण्यासाठीही कोतवाल, पोलीस पाटील आणि ग्रा.पं.शिपायाची नियूक्ती केली आहे. जीओ फेसींग आणि लाईव्ह ट्रॅकिंग असे दोन टप्पे यामध्ये असतील. यातून एकही संशयीत सुटणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत, अशांवर गावातील पथकांमार्फत नजर ठेवली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिका-यांना याबाबत पत्र काढले आहे. 

सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरूबाहेरून आलेल्या लोकांची नोंदणी, तपासणी करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून प्रत्येक गावात आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. एखाद्याला लक्षणे जाणवले तर तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांना सुचना केली जाईल. पथक गावात जावून तपासणी करून उपचार करतील. गंभीर असल्यास त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जाणार आहे. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार हे नियंत्रण ठेवणार आहेत.

एकवेळ समज,नंतर कारवाई‘होम क्वारंटाईन’ असलेल्या लोकांवर आता पुरावा दाखविणाऱ्या मोबाईल अ‍ॅपद्वारे नजर असेल. घरातून बाहेर पडताच आम्हाला सुचना मिळतील आणि संबंधिताला तात्काळ कॉल केला जाईल. एकवेळा समज दिल्यानंतरही चुका केल्यास कारवाई केली जाईल. सर्वेक्षणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे.- अजित कुंभार,मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड