शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जगावरील कोरोनाचे संकट टळावे;साध्या पद्धतीने गुढी उभारून नागरिकांच्या सोशलमीडियावरून शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:42 IST

आष्टी तालुक्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा घरात साध्या पद्धतीने गुढी उभारून साजरा

- अविनाश कदम आष्टी : तालुक्यात मराठी नविन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने आरोग्याच्या हिताची गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा संचारबंदी लागू केल्यामुळे कुठेही न जाता कुटुंबासमवेत नागरिकांनी साजरा केला. नविन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊ शकत नसल्याने कोरोना संकट टळुन सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशा सदिच्छा एकमेकांना सोशलमिडीयाच्या माध्यमातून देण्यात आल्या.

कोरोना व्हायरचा पादुर्भाव टाळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देश लाॅक डाऊनची घोषणा केली आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये संचार बंदी लागु केल्याने मराठी नववर्षाची गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी पुजेसाठी लागणारी फुलं, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी असे सर्व साहित्य शहरी भागासह ग्रामीण भागात तुटवडा आला होता.ग्रामिण भागातील किराणा दुकानातील पुजेसाठी लागणारे साहित्य सकाळीच संपल्याने नागरिकांनी यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या या साहित्याविना गुढी उभारली.

महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी आनंदात आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये गुढी उभारून तिला गोड नैवैद्य दाखविला जातो. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरविली जाते. या दिवशी घरोघरी जात आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतन केले जाते. मात्र,यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने सोन्याचे दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत.कोरोनाचे संकट टळो सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा नागरिकांनी घरात बसून एकमेकांना व्हाॅट्सअॅप,फेसबुक,या सोशलमिडीयाद्वारे दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडgudhi padwaगुढीपाडवा