शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाच्या भीतीने केला घात; रिपोर्ट निगेटिव्ह असूनसुद्धा तरुणाने संपवला जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:58 IST

आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन्ही हातांच्या नसा कापल्याची प्राथमिक माहिती आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलामला कोरोना झाला आहे असे म्हणत एका रूममध्ये क्वारंटाइन केले होते.

गेवराई : अहवाल निगेटिव्ह असून सुद्धा कोरोनाच्या भितीने एका तरुणाने स्वतःला क्वारंटाइन केले. यानंतर दोन्ही हाताच्या नसा कापून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश बाळकृष्ण गायकवाड असे मृताचे नाव असून शहरातील अहिल्यानगर येथे ही घटना घडली.

तालुक्यातील धोंडराई येथील प्रकाश गायकवाड हे पुणे येथे खाजगी नोकरीस होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ते शहरातील अहिल्या नगर भागात मागील तीन महिन्यांपासून वास्तव्यास होते. आठ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला. त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. परंतु, मला कोरोना झाला आहे असे म्हणत त्यांनी स्वत:ला एका रूममध्ये  क्वारंटाइन केले होते. कोरोनाबदलची भिती वाढत जाऊन त्यांनी शनिवारी पहाटे पाचच्या वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन्ही हातांच्या नसा कापल्याची प्राथमिक माहिती आहे.  याप्रकारणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड