शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Coronavirus : मुंबईच्या विमानतळावर कर्तव्य बजावून परतलेला बीडचा डॉक्टर आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 09:03 IST

ताप आणि खोकला जाणवल्याने स्वतःहून रुग्णालयात दाखल

बीड : बीड रहिवाशी असलेल्या डॉक्टरने मुंबईच्या विमानताळवर कर्तव्य बजावले होते. दोन दिवसापूर्वी ते बीडला परतले. शनिवारी त्यांना ताप व खोकल्याची लक्षणे जाणवल्याने त्यांनी स्वता: आरोग्य विभागाशी संपर्क केला. रात्री 8 वाजता ते जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झाले आहेत. 

बीडमधील एक २२ वर्षीय डॉक्टर मुंबईला राहतात. त्यांची मुंबईच्या एका विमानतळावर  प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ड्यूटी लावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी ते सुटीवर बीडला आहेत. शनिवारी सकाळीच त्यांना ताप आणि खोकला आला.  स्वता: डॉक्टर असल्याने आणि पुढील दुष्परिणाम माहिती असल्याने ते स्वता: दुपारी जिल्हा रुग्णालयात गेले. येथे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांची भेट घेतली. रात्री 8 वाजता त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. स्वॅप तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

आतापर्यंत चार संशयीत; सर्वांचे निगेटिव्ह अहवालआतापर्यंत जिल्ह्यात चार व्यक्तींना संशयित म्हणून क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅप घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर केवळ एका महिलेला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. इतर तिघांना लक्षणे नसल्याने घरीच ठेवून संपर्क करून पाठपुरावा केला जात होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड