शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

CoronaVirus : जामखेडला कोरोनाग्रस्त आढळताच बीड ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:08 IST

पाटोदा तालुक्यातील सौताडा चेकपोस्टवर अडविलेल्या मजूरांची केली तपासणी

ठळक मुद्देसौताडा चेक पोस्टवर आरोग्य विभागाचा खडा पहाराजामखेड कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील एकही संशयित बीडमध्ये नसल्याचा दावा

बीड : कोरोना विषाणू आता बीडच्या सिमेजवळ आला आहे. आष्टी, पाटोद्यालगत असलेल्या जामखेडमध्ये (जि.अहमदनगर) दोन कोरोनग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे आता बीडची यंत्रणाही अलर्ट झाली आहे. सौताडा चेकपोस्टवरून बंदी घालण्यात आली असून सर्वत्र खडा पहारा दिला जात आहे. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात बीड जिल्ह्यातील एकही व्यक्ती नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

जिल्ह्याच्या सिमेवरच जामखेड आहे. आष्टी आणि पाटोदा हे दोन तालुके जामखेड लगत आहेत. याच जामखेडमध्ये दोन कोरोनग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बीड आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. बाहेरून येणाºयांचे लोंढे सुरूच असून ते अडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारीही सौताडा चेकपोस्टवर सातारा जिल्ह्यातून उसतोड मजूर आले होते. त्यांनाही जिल्ह्यात  प्रवेश नाकारण्यात आला. त्यांची वाहली आरोग्य केंद्रातील पथकाने तपासणी केली. त्यात एकालाही लक्षणे जाणवली नाहीत. ही गर्दी आल्याचे समजताच उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार मुंडलोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल.आर.तांदळे, पोलीस निरीक्षक माने यांनी चेकपोस्टला भेट देत आढावा घेतला. तसेच चेकपोस्टवरून कोणीही जिल्ह्यात येणार नाही, याबाबत सक्त आदेश देण्यात आले.

संपर्कातील गावांमध्ये चौकशीजामखेड शहरात ज्या गावातील लोकांचा संपर्क येतो, त्या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून चौकशी केली जात आहे. बाधित लोकांच्या संपर्कात काही लोक आले आहेत का? याची चाचपणी सूत्रांकडून केली जात आहे. आशा, अंगणवाडी सेविकाही माहिती घेत आहेत. जवळपास आठ ते दहा गावांचा जामखेडशी संपर्क येत असल्याचे सूत्रांकडून समजते.  

बाधितेच्या संपर्कात कोणी नाहीसर्वत्र योग्य त्या सुचना करण्यात आलेले आहेत. चेकपोस्टवरील व पथकांतील अधिकारी, कर्मचारी सर्वेक्षण व तपासणी करीत आहेत. बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेऊन तपासणी केली जात आहे. संशयितांना घर व संस्थात्मक अलगीकरण केले जात आहे. जामखेडमधील बाधितांच्या संपर्कात बीडमधील एकही व्यक्ती आली असल्याचे आतापर्यंत तरी सापडले नाही.- डॉ.आर.बी.पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

सर्वेक्षण आणि तपासणी सुरूसौताडा चेकपोस्टवर बाहेरून आलेल्या मजूरांची तपासणी करण्यात आली. कोणालाच लक्षणे जाणवली नाहीत. आमचे पथक तैनात आहे. तसेच बाधितांच्या संपर्कात कोणी आहे का? याची माहिती घेतली जात आहे. आशा, अंगणवाडी सेविका सर्वेक्षण करीत आहेत. तसेच पथकांकडूनही आढावा घेतला जात आहे.- डॉ.एल.आर.तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड