शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : स्वच्छतेसोबत जनजागृती; घंटागाडयाद्वारे होतेय कचरा संकलनासह कोरोनावर प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 19:12 IST

अंबाजोगाई नगर परिषदेच्या १८ गाडयांचा यात समावेश

ठळक मुद्देनगर परिषद कर्मचाऱ्यांचा पुढाकारशहरातील सर्व भागात होतेय जनजागृती

अंबाजोगाई -  कोरोना विषाणंूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता. अंबाजोगाई नगर परिषदेने कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे  उपाय म्हणून घंटा गाडीच्या ध्वनिक्षेपणावरून शहरात जनजागृती सुरू केली आहे. कचरा संकलनासोबतच जनजागृती तर दुपारच्या वेळी विविध सूचना देण्याचे काम घंटागाडया करू लागल्या आहेत. 

                    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई नगर परिषदेने स्वच्छता व जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे  हे शासनासमोर मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी नगर परिषद प्रशासन विविध माध्यमातून जनजागृती व स्वच्छतेचे कार्य करीत आहेत. अंबाजोगाईत १८ घंटागाडया शहरात कचºयाचे संकलन करतात. आता या १८ ही घंटागाडयाच्या माध्यमातून कचरा संकलनाबरोबरच शहरवासियांचे प्रबोधन केले जात आहे. शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये गेलेली घंटागाडी  त्या परिसरात थांबून कोरोनाच्या संदर्भातील सर्व सूचनांची माहिती देते. आरोग्यविषयक सल्ले व मार्गदर्शनही या माध्यमातून होते. तसेच ज्यावेळी संचारबंदी शिथिल असते त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी  नगर परिषद कर्मचाºयांचा मोठा पुढाकार आहे.

सोशल डिस्टन्सबाबत घंटागाडयाच्या माध्यमातून मंडी बाजार, भाजीपाला मार्केट व किराणा दुकान, औषधी दुकान, या दुकानांसमोर जनजागृतीचे काम सुरू आहे. संचारबंदीतही शासनाच्या वेळोवेळी येणाºया सूचना सर्वसामान्यांमध्ये पोहचवण्यासाठी या घंटागाडीची मोठी मदत होऊ लागली आहे.अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने शहरात स्वच्छतेबरोबर जनजागृतीचेही काम सुरू आहे.

शहरातील  १८ ही घंटागाडयांवर कर्मचारी शासनाच्या सर्व सूचना नागरिकांपर्यंत थेट पोहचवू लागल्याने  जनजागृतीचे काम सोपे झाले आहे. जोपर्यंत लॉकडाऊन आहे. तोपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. अशी माहिती अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक आनंत वेडे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड