शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाची स्वॅब दिलाच नसल्याची बनवाबनवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:22 IST

शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे होती. म्हणून तो स्वत: रविवारी जिल्हा रुग्णालयात गेला आणि स्वॅब दिला.

ठळक मुद्देखात्री करण्यासाठी आरोग्य विभागाची उडाली झोपपहाटेच्या सुमारास थांबली तारांबळ

बीड : शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका व्यक्तीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याला संपर्क केला असता त्याने आपण स्वॅबच दिला नसल्याचे सांगितले. स्वॅब नाही आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? हे ऐकून आरोग्य विभागाची झोपच उडाली. खात्री करण्यासाठी सर्वच घामाघुम झाले. पूर्ण रात्र तपासणी केल्यावर त्याने स्वॅब दिल्याची कबुली दिली. पहाटेच्या सुमारास ही तारांबळ थांबली आणि अधिकाऱ्यांनी घामच पुसला. 

शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे होती. म्हणून तो स्वत: रविवारी जिल्हा रुग्णालयात गेला आणि स्वॅब दिला. त्याचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. शिरूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी त्या रुग्णाला संपर्क केला. तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आपण रुग्णालयात दाखल व्हा, असे सांगितले. यावर त्या रुग्णाने आपण स्वॅबच दिला नाही तर रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? असा उलट प्रश्न केला. याची खात्री करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. काही अधिकारी त्याची विनवणी करून खरे बोलण्यासाठी सांगत होते. परंतु तो आपण स्वॅब दिलाच नाही, या मतावर ठाम होता. इकडे काही अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात स्वॅबची खात्री केली. त्यात त्याने स्वॅब दिल्याचे स्पष्ट झाले. तर दुसऱ्या बाजूला गावातील सरपंचालाही संपर्क करून माहिती दिली. सरपंचाने या रुग्णाशी संपर्क केल्यावर त्याने आपण स्वॅब दिल्याची कबुली दिली. सदरील सरपंचाने ही माहिती आरोग्य विभागाला दिली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. रात्री १० वाजता सुरू झालेला हा तपास पहाटेच्या सुमारास संपला. 

खोटी माहिती देण्याचे प्रकार वाढलेस्वॅब घेतलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याला तात्काळ नियंत्रण कक्षातून संपर्क केला जातो. यावर काही लोक खोटी माहिती देणे, दिशाभूल करण्याचे प्रकार करीत आहेत. असाच प्रकार शिरूरमधील बोरगावच्या रुग्णाने केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणे गरजेचे आहे.

बोरगावच्या रुग्णाला अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. यावर त्याने स्वॅबच दिला नसल्याचे सांगितल्याने तारांबळ झाली. खात्री केल्यानंतर त्याने स्वॅब दिल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्या रुग्णानेही कबुली दिली. - डॉ.अशोक गवळी, तालुका आरोग्य अधिकारी, शिरुर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड