शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

coronavirus : आरोग्य पथक दिसताच पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धुम; तासाभराच्या प्रयत्नानंतर लागला पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 3:24 PM

पोलिसांच्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला ताब्यात घेण्यात यश आले.

माजलगाव ( बीड ) : शहरातील जिजामाता नगर भागात राहणाऱ्या 30 वर्षीय युवकाला कोरोना झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे उपचारासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी आरोग्य पथक व पोलीस गेले. मात्र त्यांना पाहताच रुग्णाने धुम ठोकल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी घडली. पोलिसांच्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला ताब्यात घेण्यात यश आले.   माजलगाव शहरात मागील आठ दिवसात कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी माजलगाव तालुक्यात शनिवारी 19 रूग्ण पाँझीटीव्ह निघाले होते त्यात माजलगाव  शहरातील तानाजी नगर भागातील एका युवा रूग्णाचा समावेश होता. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोग्य सेवक ,पोलीस , नगरपालिकेचे कर्मचारी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याने घराबाहेर येऊन तेथुन धुम ठोकली. यामुळे सर्व यंत्रणा व नागरिक हैराण झाले व त्याच्यामागे पोलीस व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पिच्छा केला व एक तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तो पर्यंत त्या रुग्णाने पळत असतांना 2-3 जणांचा धडक दिल्याचे  नागरिकांनी सांगितले. त्या रूग्णाला ताब्यात घेताच पोलीस , आरोग्य यंत्रणा , नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी निश्वास सोडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड