शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोणीही यावे ओळखपत्र घ्यावे, माजलगाव नगरपालिकेतुन शेकडो पासचे वाटप ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 17:56 IST

अत्यावश्यक सेवेच्या पासचा होत आहे गैरवापर

माजलगाव : शहरात कोरोना मुळे कर्मचाऱ्यांना ज्या-त्या कार्यालयाने पास दिल्या असून अत्यावश्यक सेवा देणा-यांना पोलीसांमार्फत पास दिल्या गेल्या आहेत. मात्र नगर पालिकेतुन कर्मचाऱ्यांना सोडुन बाहेरील लोकांना शेकडो पास दिल्या असल्याने ते लोक याचा गैरवापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत असतांना प्रभारी मुख्याधिकारी यांना या बाबतची भनकही नाही.

बीड जिल्ह्यातील दोन-अडीच तासाचे संचारबंदी शिथिल वगळता एकवीस दिवस संचारबंदी राहणार आहे. या संचार बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना पोलिसांनी पास दिल्या असून ते या पासवर अत्यावश्यक सेवा देत असून त्यांना या पासवर पेट्रोल देखील मिळत आहे. या संचार बंदीच्या काळात अनेक कार्यालयाचे कर्मचारी पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करत असून ज्या त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या  कार्यालयात कडून देण्यात आलेले ओळखपत्र किंवा पास यावर त्यांचा वावर सुरू आहे. त्याचप्रमाणे शहरात नगरपालिकेतील कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत. 

याचाच काही कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेण्याचे ठरवले असून अनेक कर्मचाऱ्यांनी आपली मित्र कंपनी , नातेवाईक , अनेक नगरसेवकांचे हितचिंतकांना नगरपालिकेतुन पासचे वाटप करण्यात आले असुन ते ही बोगस पास गळ्यात अडकवुन दिवसभर बाहेर फिरताना दिसत असुन हेच लोक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गाडया घेऊन पेट्रोल भरताना सर्वात पुढे दिसुन येत आहेत. यामुळे आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल मिळत नसल्याचे चित्र सध्या शहरात पहावयास मिळत आहे.        सध्या माजलगाव नगरपालिकेचा कारभार रामभरोसे सुरू असून नगराध्यक्ष जवळपास एक महिन्यापासून भ्रष्टाचाराच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत आहेत. तर  मागील तीन महिन्यांपासून प्रभारी मुख्याधिका-यांंवर सुरू असून महिन्या पंधरा दिवसाला कुठल्या तरी एका जनाकडे मुख्याधिकारी पदाचा चार्ज दिला जातो,तसेच कोणीच मुख्याधिकारी आठवड्यातून एक-दोन दिवस वगळता याठिकाणी थांबण्यास तयार नाही. याचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांनी उचलण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या सर्व बोगस पास एका नगरसेवकाच्या घरी बसुन वाटप केल्या जात असुन या पाससाठी 300-500 रूपये घेतले जात असल्याचे नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

बोगस सह्या केल्यामाझ्याच बोगस सहया केल्या , पोलिसांना कळवले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतुन अनेकांना बोगस पास वाटप करण्यात आली असल्याची माहिती मला मिळाली असून यात अनेक पासवर माझ्या बोगस सह्या देखील केल्या गेल्या असुन याबाबत मी बैठकीत पोलिसांना याबाबत माहिती देखील दिली आहे-- गणेश डोंगरे , कार्यालयीन अधिक्षक, नगरपालिका 

कारवाई करण्यात येईल या बोगस पास बाबत मला माहिती नसुन या बाबत माहिती घेतली जाईल. असा प्रकार झाला असल्यास संबंधीत दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. ---भागवत बिघोत , प्रभारी मुख्याधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड