शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; राज्यात ३० लाख कोरोनाबाधितांच्या सहवासितांची नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 19:49 IST

corona virus : राज्यात आढळलेल्या ५१ लाख ४३ हजार ९६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतल्यानंतर त्यांची माहिती पोर्टलवर तात्काळ अपडेट करणे आवश्यक होते; परंतु आतापर्यंत केवळ २१ लाख ४८ हजार ४४७ रुग्णांच्या सहवासितांचीच माहिती अपडेट केली आहे.

ठळक मुद्देमाहिती अपडेट करण्यात बीड जिल्हा अव्वल, तर औरंगाबादचा नीचांक

बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला असला तरी त्यांची माहिती पाेर्टलवर अपडेट करण्यात राज्यातील २७ जिल्हे कमी पडले आहेत. अद्याप ३० लाख लोकांची माहिती अपडेट न केल्याने आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढले आहे, तर दुसऱ्या बाजूला नोंदणी करण्यात बीड जिल्हा अव्वल असून, औरंगाबादचा नीचांक आहे.

राज्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी अद्याप पूर्णपणे यश आलेले नाही, तसेच नवे रुग्ण शोधण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध आराेग्य विभाग घेत आहे. राज्यात आढळलेल्या ५१ लाख ४३ हजार ९६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतल्यानंतर त्यांची माहिती पोर्टलवर तात्काळ अपडेट करणे आवश्यक होते; परंतु आतापर्यंत केवळ २१ लाख ४८ हजार ४४७ रुग्णांच्या सहवासितांचीच माहिती अपडेट केली आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले असून, त्यांची टक्केवारी ८० पेक्षा कमी आहे. यात सर्वांत आघाडीवर औरंगाबाद असून, केवळ ३० टक्के माहिती अपडेट केल्याचे समोर आले आहे. हाच धागा पकडून आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्वच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढून माहिती अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत.

बीड जिल्ह्याचे काम ९९ टक्केराज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात बीड जिल्हा सुरुवातीपासूनच अव्वल राहिला आहे. तसेच याची माहितीही आरोग्य विभागाच्या नियंत्रण कक्षातून नियमित अपडेट केली जाते. यात बीड जिल्हा राज्यात अव्वल असून, ९९ टक्के माहिती अपडेट केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी वारंवार आढावा घेतला. डॉ. बेग व नियंत्रण कक्षातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेत माहिती दिल्याने जिल्हा अव्वल राहिला आहे.

...अशी आहे राज्याची आकडेवारी माहिती अपलोड करण्यात आलेली जिल्हानिहाय आकडेवारी...बीड ९९ टक्के, जालना ९८, सातारा ९१, अमरावती ८८, नांदेड ८७, धुळे ८६, सांगली ८४, सिंधुदुर्ग ७९, नागपूर ७८, नाशिक ७७, कोल्हापूर ७७, परभणी ७६, यवतमाळ ७२, भंडारा ७०, अकोला ७, सोलापूर ६९, जळगाव ६४, रायगड ६४, नंदुरबार ६३, हिंगोली ६३, गडचिरोली ६१, बुलडाणा ६१, वर्धा ५८, मुंबई ५६, पालघर ५२, अहमदनगर ५२, उस्मानाबाद ५१, चंद्रपूर ४९, रत्नागिरी ४३, पुणे ४२, लातूर ३७, वाशिम ३६, ठाणे ३३, औरंगाबाद ३०, अशी टक्केवारी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडAurangabadऔरंगाबाद