शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरस; बीडची आरोग्य यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:20 IST

सौदी अरेबियामध्ये गेलेला नांदेडचा तरूण परतल्यानंतर त्याला सर्दी व ताप आला. त्याला ‘कोरोना’चा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. ही माहिती वाऱ्यासारखी मराठवाड्यात पसरली. त्यानंतर बीडचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला.

ठळक मुद्देनांदेडमध्ये आढळला संशयित रुग्ण : घाबरून जाऊ नका, काळजी घ्या, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बीड : सौदी अरेबियामध्ये गेलेला नांदेडचा तरूण परतल्यानंतर त्याला सर्दी व ताप आला. त्याला ‘कोरोना’चा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. ही माहिती वाऱ्यासारखी मराठवाड्यात पसरली. त्यानंतर बीडचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा काळजी घेण्यासह इतर उपाययोजनांबाबत सक्त सूचना करण्यात आल्या आहेत.कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांत ३ हजार बळी गेले आहेत. भारतातही काही संशयित आढळले आहेत. त्यातच नांदेड जिल्ह्यातील एक २५ वर्षीय तरूण सौदी अरेबियाला कामासाठी गेला होता. या आजाराच्या भीतीने तो परतला. नांदेडमध्ये येताच त्याला सर्दी, ताप येऊन कोरोनासारखी लक्षणे दिसू लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला. नांदेडची ही माहिती सोशल मीडियाद्वारे वाºयासारखी पसरली. त्यानंतर बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.अगोदरच जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करून यंत्रही तैनात केले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांना याबाबत सक्त सूचना आणि आदेश दिले आहेत. एकाही रुग्णाबाबत संशय जाणवताच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी याबाबत आढावा बैठकाही घेतल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडcorona virusकोरोना