शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

Corona Virus In Beed : लिंबुटा ग्रामस्थांची कोरोनाविरुद्ध खबरदारी; बाहेरच्या नागरिकांना केली गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 14:00 IST

बाहेर गावाहून नागरिकांना गावात प्रवेश बंदी

ठळक मुद्देगावातील तरुणांनी घेतला पुढाकार

- संजय खाकरेपरळी : कोरोनाच्या धास्तीने परळी तालुक्यातील गोपीनाथगडा समोरील लिंबुटा येथे बाहेरगावहून येऊन राहणाऱ्या लोकांसाठी गुरुवारी गाव बंदी केली आहे. गावात येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. लिंबुटा गावातील 50 युवकांच्या पुढाकाराने बाहेरच्यासाठी ही गावबंदी करण्यात आली असल्याचे  गावातील सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामपंचायत सदस्य  मोहन मुंडे यांनी सांगितले,                     

परळी -बीड राज्यरस्त्यावरील गोपीनाथगडा जवळ लिंबुटा हे  चौदाशे पन्नास लोकसंख्येचे गाव आहे .राज्यातील  कोरोना च्या पार्श्वभूमीवर या गावात पुणे, औरंगाबाद मुंबई येथून  नौकरी व  व्यवसायात असलेले गावचं  90 लोक  गेल्या काही दिवसात आले आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे  .  गेल्या दोन दिवसापासून जे गावचे लोक नाहीत ते सुद्धा लिंबुटा येथे येऊ लागल्याची  कुंणकुण गावातील लोकांना लागताच  गावाच्या कमानीजवळ बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत  अन्य मार्गाने ही बाहेरच्यांना येण्यास मज्जाव केला जाणार असल्याचे ही सांगण्यात आले,गावातील पण बाहेर गावी आहेत त्यांना तपासणी करूनच गावात प्रवेश दिला  जाणार आहे             

 मौजे लिंबुटा गावाची सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटाच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सादग्राम निर्मिती कडे  (आदर्श गाव)वाटचाल सुरू आहे. वृक्ष संवर्धन,दर १५ दिवसातून एकदा लोकसहभागातून ग्रामस्वच्छता,यासह शिक्षण,आरोग्य,शेती व पर्यावरण, रोजगार व कौशल्ये विकास आणि  वृद्धसेवा या पाच विषयावर   काम  जून 2019 पासून सुरु आहे अशा आदर्श गावात आज बाहेरच्याना गावबंदी केली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड