बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुरुषांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. पुरुषांचे प्रमाण ६९ तर महिलांचे ३१ टक्के एवढे आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही तब्बल ७२ टक्के आहे. बाधित रुग्णांमध्ये २६ ते ४४ वयोगटातील सर्वाधिक लोक आहेत. यावरून कोरोनाने पुरुषांचा जास्त घेरल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८४ हजार ५८३ लोकांची चाचणी करण्यात आली आहे. पैकी १ लाख ६७ हजार ५४४ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १७ हजार ३० लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण चाचण्यांमध्ये पुरुषांच्या १ लाख ३८ हजार ३८५ एवढ्या असून महिलांच्या ४६ हजार १२९ एवढ्या आहेत. यात पुरुषांच्या चाचण्या जास्त आहेत. पुरुष कोरोनाकाळातही बाहेर फिरत होते. महिला लॉकडाऊनमध्ये घरातून जास्त बाहेर पडल्या नाहीत. तसेच पुरुष बाधितांच्या संपर्कातील लोकही जास्त पॉझिटिव्ह आल्याने पुरुषांची रूग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच बाधितांमध्ये १७ हजार ३९ पैकी तब्बल ११ हजार ७५७ पुरुष आहेत तर ५ हजार २८२ महिला आहेत. आजही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून चाचण्या करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुरुषांनीही कोरोनापासून बचावासाठी काळजी घेण्याची गरज आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करण्यासह प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये बीड अव्वल
बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात बीड जिल्हा आरोग्य विभाग अव्वल आहे. प्रतिरुग्ण २४ टक्के प्रमाण असून आतापर्यंत ४ लाख १० हजार ५२० लोकांचा शोध घेण्यात आला आहे. हाय रिस्क वाल्यांचा स्वॅब घेण्यात आला तर लो रिस्क वाल्यांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.
कोट
चाचण्या आणि बाधित रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. मृत्यूमध्येही पुरुषच जास्त आहेत. त्यामुळे अद्यापही धोका टळलेला नाही. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. थोडाही त्रास जाणवला तर तपासणी व चाचणी करून घ्यावी.
डॉ. आर. बी. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
------
अशी आहे आकडेवारी
एकूण रुग्ण - १७०३९
एकूण मृत्यू - ५४०
डेथ रेट - ३.२६ टक्के
रिकव्हरी रेट - ९५.२ टक्के
डबलींग रेट - ३५१.८
पॉझिटिव्हिटी रेट - १२.१ टक्के
------
वयानुसार चाचणी, पॉझिटिव्ह आणि मृत्यू
वयोगट
चाचणी
पॉझिटिव्ह
मृत्यू
०-१७
१६६०६
१३६३
०
१८-२५
३१३६७
२०४४
०
२६-४४
८३०३१
६८१७
४८
४५-६०
३८७४८
४४३०
१६२
६० पेक्षा जास्त
१४७६२
२३८५
३३०
-----
महिला, पुरुषांची चाचणी व पॉझिटिव्ह
लिंग
चाचणी
पॉझिटिव्ह
मृत्यू
पुरुष
१३८३८५
११७५७
३८८
१८-२५
४६१२९
५२८२
१५२
----