शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातील साहित्य खरेदी घोटाळा; एसीएससह दोन डॉक्टरांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:28 IST

लातूर, उस्मानाबादला सेवा वर्ग, आयुक्तांच्या आदेशानंतर उपसंचालकांची कारवाई

बीड : कोरोनाकाळातील साहित्य खरेदीतील घोळ आणि कंत्राटी भरतीतील अनियमितता यावर ठपका ठेवून बीड जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना उस्मानाबाद, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश माने यांची लातूरमधील उदगीर येथे सेवा वर्ग केली. डॉ.बाबासाहेब ढाकणे यांच्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. आयुक्तांच्या आदेशानंतर लातूर उपसंचालक डॉ.हेमंत बोरसे यांनी ही कारवाई केली आहे. डॉ.राठोड व डॉ.माने यांना शुक्रवारी दुपारीच तडकाफडकी कार्यमुक्तही करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाकाळात कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली होती. तसेच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश माने, डॉ.बाबासाहेब ढाकणे यांच्यावर जबाबदारी दिली होती. याच काळात खरेदी केलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी उपसंचालकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत झाल्या होत्या.

याबाबत लातूर उपसंचालकांनी एका समितीमार्फत चौकशीही केली होती. याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला होता. यात या सर्वांना दोषी ठरविले होते. वाढत्या तक्रारी आणि समितीचा अहवाल पाहून आरोग्य आयुक्तांनी या सर्वांना जिल्हा रुग्णालयातून कार्यमुक्त करून इतर जिल्ह्यात सेवा वर्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर लातूर उपसंचालक डॉ.हेमंत बोरसे यांनी डॉ.राठोड यांना उस्मानाबाद तर डॉ.माने यांना लातूरमधील उदगीर येथे सेवा वर्ग केले. डॉ.ढाकणे यांच्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. परंतु डॉ.राठोड व डॉ.माने यांना तडकाफडकी कार्यमुक्तही करण्यात आले आहे. बीडचा एसीएसचा अतिरिक्त पदभार रायमोहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष शहाणे यांच्याकडे साेपविण्यात आला आहे.

आंदोलने, तक्रारींची उशिरा दखलजिल्हा रुग्णालयातील भरतीमधील अनियमितता, खरेदी घोटाळा आदींबाबात आंदोलने झाले. शिवाय तक्रारींचाही ढिगारा लागला होता. परंतु आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले. मागील वर्षी झालेल्या तक्रारींची उशिराने चौकशी झाली. समितीने अहवाल देण्यापूर्वी एकदा 'बसून' अहवाल देण्याची 'हिंमत' दाखवली होती. परंतू समोरच्यांकडून 'बोर' उत्तर मिळाल्याने अहवाल तयार करून 'सें'ड केला होता. अखेर यावर शुक्रवारी कारवाई झाली.

घोटाळा झाला; आता वसुली कोणाकडून?साहित्य खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका समितीने ठेवला हे खरे असले तरी आता घोटाळ्यातील पैसे कोणाकडून वसूल करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. इतर तक्रारींची कधी दखल घेणार? उपसंचालकांनी जशी कारवाईत तत्परता दाखवली, तशी इतर प्रकरणांतही दाखवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या