शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

Corona In Beed : संतापजनक ! निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करत असलेल्या कामगारास रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 16:53 IST

फवारणी करत असताना पाठीमागून डोक्यात रॉड मारला

केज : देशात व राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने प्रशासनाच्या वतीने योग्य त्या  खबरदारीच्या  उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील लहुरी ग्रामपंचायतच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने शुक्रवारी गावात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचारी वर्गासह दोघांना मजुरीने लावून गावात सोडियम हायड्रो क्लोराइडची फवारणी सुरू केली . यावेळी रोजंदारी कामगारास चार ते पाच जणांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे दरम्यान हि मारहाण कोणत्या कारणामुळे झाली याची माहिती समजू शकली नाही या प्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात  आला नव्हता.

देशात व राज्यात कोरोना विषाणूचे संकट आल्याने या संकटाचा सामना प्रशासन विविध उपाययोजना राबवून करत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील लहुरी गावातील ग्रामपंचायतने गावातील स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. गावातील कचरा व नाल्याची साफसफाई जेसीबीने करून गावात ग्रामपंचायतच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्फत गावातील चार प्रभागा मध्ये शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायतचे शिपाई वचिष्ट वायकर,बाळासाहेब कांबळे यांच्यासह रोजंदारीने फवारणी करण्यासाठी लावलेले कोंडीराम शिंपले व गणेश चाळक हे गावातील नाली ओटे यांच्यावर सोडियम हायड्रो क्लोराईड ची फवारणी करत होते , गणेश चाळक हा प्रभाग क्रमांक दोन मध्ये फवारणी करत असताना त्याच्या डोक्यात पाठीमागून रॉड मारून त्यास जखमी करण्यात आले हि मारहाण चार ते पाच जणांनी केल्याची सांगण्यात येत आहे.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गणेश नागनाथ चाळक यास उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गणेश यास मारहाण कोणत्या कारणाने व का करण्यात आली याची माहिती मिळू शकली नाही , दरम्यान गणेश चाळक यास मारहाण झाली असून  या प्रकरणी अद्याप पर्यंत केज पोलिसात गुन्हा दाखल कारणात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे. झालेला प्रकार चुकीचा - ललिता चाळक गावातील चार प्रभागामध्ये  आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रामपंचायतचे दोन कर्मचारी व रोजंदारीवरील दोघेजण फवारणी करत असताना फवारणी करत असलेल्या गणेश चाळक या मजुरास मारहाण करण्यात आली हा प्रकार चुकीचा आहे गणेश याने मुंबई पुण्याहून गावात आलेल्या शंभर जणांना रिक्षाने रुग्णालयात नेऊन तपासणी करून आणले आहे गावात आज ३५ जण होम क्वारंटाईन आहेत झालेला प्रकार हा चुकीचा असून यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे असे ग्रामपंचायतच्या सरपंच ललिता चाळक  यांनी म्हटले आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड