याप्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग उर्फ मुकेश बाळासाहेब बोबडे (रा.आयोध्यानगर बहिरवाडी बीड) असे मारहाण झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. पेठ बीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोबडे याच्याकडे सागर देशपांडे याचे व्याजाचे पैसे घेतले होते. दरम्यान पैशाच्या देवाण घेवाणीवरून व दिलेल्या पैशाबाबत वडिलांना का सांगितले, अशी भांडणाची कुरापत काढून मुकेश बोबडे दुचाकीवरून मोंढा भागातून जात असताना स्मशानभूमी परिसरात सागर देशपांडे व इतर दोघांनी त्याला अडवले व शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कुकरीसारख्या हत्याराने वार करून जखमी केले. तसेच बोबडे याच्या गाडीच्या डिक्कीतून रोख १० लाख रुपये काढून घेतले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बोबडे याच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात सागर देशपांडे (रा.कबाड गल्ली बीड ) व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि विश्वास पाटील हे करत आहेत.
व्याजाच्या पैशामुळे कुकरीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST