शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांच्या उपासमारीची धग पोंचली माजलगाव तहसीलवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:54 IST

वाळु बंद असल्यामुळे शहर व  परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

माजलगाव (बीड ) : वाळू बंद असल्यामुळे शहर व  परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय शहरात सुरु करावे या मागणीसाठी कामगारांनी आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

तालुक्यातील फक्त एकाच वाळू घाटाच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित घाटाची प्रक्रिया रखडली आहे. सध्या एकाच ठिकाणाहुन वाळू असल्याने याचे दर मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. महसुल व पोलीस प्रशासनाने चोरट्या वाळू वाहतुकीवर अंकुश बसविल्यामुळे वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. प्रशासनाकडून टेंडर धारकांसह वाहनधारकांना नियमाची यादी दाखवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारक व लिलाव धारकांकडून अव्वाच्यासव्वा दराने वाळूची विक्री होत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्यांना बांधकाम करणे कठीण झाले आहे. तर आधीची बांधकामे ठप्प पडली आहेत. मात्र, या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम थेट हातावर पोट असणाऱ्या बांधकाम कामगार व मजुरांवर होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

यामुळे कामगारांनी बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय शहरात सुरु करावे या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान मोंढा भागातून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. मोर्चात बांधकामाशी संबंधीत सर्व व्यापारी, विविध संघटना आदींचे पदाधिकारी सामिल होते. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तहसीलदार एन. जी. जंपलवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली.  त्यानंतर मोर्चेक-यांच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मोर्चाचे नेतृत्व निलेश काकडे, शेख शकील, शेख करीम, भास्कर घाडगे, मुज्जुभाई आदींनी केले.  तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, अनंत रुद्रवार, गणेश लोहिया, सुंदर साखरे, संजय सोळंके, सुभाष इंदाणी, संदेश चिद्रवार, सुधाकर देशमुख, सययद कालुभाई , मोगरेकर फरशीवाला, मिर्झा जफर बेग आदींनी सहभाग घेतला. संपूर्ण शहर व्यापलेल्या या मोर्चाची सर्वत्र चर्चा होती. 

जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करू वाळु अभावी बांधकाम व्यवसायिक तसेच मजुरांची होत असलेली परवड आम्ही जाणुन आहोत. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन उर्वरित वाळु घाटाचे लिलाव त्वरित करावेत अशी मागणी करण्यात येईल. - प्रियंका पवार, उपविभागीय अधिकारी, माजलगांव 

टॅग्स :collectorतहसीलदारBeedबीडagitationआंदोलन