शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

माजलगावमध्ये विनापरवानाच सुरु झाले उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 15:45 IST

निधी मंजूर झाला असतानाही जागेअभावी अनेक दिवसांपासुन रखडलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. परंतु,  या बांधकामासाठी नगर परिषदेकडुन रितसर परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे.

माजलगांव ( बीड ) , दि. १७ : निधी मंजूर झाला असतानाही जागेअभावी अनेक दिवसांपासुन रखडलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. परंतु,  या बांधकामासाठी नगर परिषदेकडुन रितसर परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे. तसेच हि जागा बाजारतळासाठी प्रस्तावित असल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरत आहे.   

माजलगांव येथे उपविभागीय कार्यालय सुरु होवून जवळपास 4 वर्षे झाली. स्वतंत्र इमारत नसल्याने सुरुवातीपासूनच हे कार्यालय तहसील कार्यालयाच्या इमारतीत सुरु आहे. जागे अभावी तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय कार्यालय चालविणे अडचणीचे होत असल्याने स्वतंत्र इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. शासनानेही सकारात्मक निर्णय घेत कार्यालयासाठी नविन इमारतीला मान्यता देत निधी देखील उपलब्ध करुन दिला.यानंतर तहसील कार्यालयाच्या समोरील सर्व्हे नं. 380 मधील जागेत कार्यालायचे बांधकाम सुरु झाले. मात्र, इमारत बांधकामासाठी नगर परिषदेकडुन आवश्यक असलेला बांधकाम परवानाच घेतला नसल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच शासकीय कार्यालये सुद्धा विनापरवाना बांधकाम करत असल्याचे यातून स्पष्ट झाले.  

यासोबतच याच जागेसाठी  नगर परिषदेने बाजारतळाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे मंजुरीस पाठविलेला आहे. यावर निर्णय  प्रलंबित असतानाच हे बांधकाम विनापरवाना सुरु झाल्याने यामागे बाजारासाठी जागा मिळु न देण्याचे राजकारण असू शकते अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. 

लवकरच परवाना घेऊ उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. याचा बांधकाम परवाना आम्ही नगर पालिकेकडुन अद्याप घेतलेला नाही. लवकरच  रितसर कारवाई करुन परवाना घेण्यात येईल. - डी. के.पाटील, उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग 

कारवाई करू उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बांधकाम परवान्या बाबत कसल्याही प्रकारची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विनापरवाना चालु असलेले हे बांधकाम तात्काळ थांबविण्याची कारवाई करण्यात येईल.- सहाल चाउस, नगराध्यक्ष,माजलगांव नगर परिषद