शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

बीड लोकसभा लढण्यास कॉँग्रेस तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:53 IST

आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कॉँग्रेस पक्ष तयार असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

ठळक मुद्देसंघटनात्मक बैठक : इच्छुक उमेदवारांशी चर्चा, प्रदेश कार्यकारिणीला यादी पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कॉँग्रेस पक्ष तयार असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.१३ जानेवारी रोजी येथे झालेल्या कॉँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीस पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे हे उपस्थित होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून बीड लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक उमेदवारांशी यावेळी चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवारांची नावे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीस कळविण्यात येणार असल्याचे बैठकी दरम्यान सांगण्यात आले.जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. राहुल साळवे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकीमध्ये समविचारी व धर्मनिरपेक्ष, राजकीय पक्षांना एकत्र आणून मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर होत आहे. महाराष्ट्रातही समविचारी मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची बोलणी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. मित्र पक्षांसोबत जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून लवकरच घेतला जाणार आहे. बीड जिल्ह्यात अनेक मातब्बर काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहेत. अशा इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून ती जिल्हा निवड मंडळामार्फत इच्छूक उमेदवारांशी चर्चा करून प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे.यावेळी मोदी यांनी जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक बांधणी, पक्षाचे जनसंपर्क अभियान, बूथ कमिट्यांची बांधणी आदी विषयांवर माहिती देत चर्चा केली.बैठकीस माजी आ. नारायण मुंडे, माजी आ. सिराज देशमुख, बाबूराव मुंडे, अंजली घाडगे, सेवादल नेते शहादेव हिंदोळे, तालुकाध्यक्ष महादेव धांडे, जिल्हा सचिव अ‍ॅड. विष्णूपंत सोळुंके, महादेव आदमाने, सुनील नागरगोजे, अ‍ॅड. निंबाळकर, सेवादल जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी, गोविंद साठे, आसिफोद्दीन खतीब, गणेश राऊत, अविनाश डरफे, फरीद देशमुख, राणा चव्हाण, दादासाहेब मुंडे, चरणसिंग ठाकूर, विजय मुंडे, सूर्यकांत मुंडे, डॉ. शेरखान, रवि ढोबळे, नागेश मिठे, महादेव मुंडे, विठ्ठल जाधव, हरिभाऊ सोळुंके, राहुल वावळे, सफदर देशमुख, शामसुंदर जाधव, जयप्रकाश प्रकाश आघाव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसElectionनिवडणूक