शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

परळी विधानसभेवर कॉँग्रेसचाही दावा, जिल्हाध्यक्ष देशमुखांनी दिले धनंजय मुंडेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 19:01 IST

कॉँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांनी शड्डू ठोकत धनंजय मुंडे यांना दिले आव्हान.

परळी : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची काँग्रेसने देखील इच्छुक आहे. बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांनी शड्डू  ठोकत धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. परळी मतदारसंघास गतवैभव प्राप्त करून शहरात शांतता आणि  व्यापारपेठ भरभराटीला आणू, असे सांगून देशमुख यांनी महाविकास आघाडीतून काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक लढविस इच्छुक असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले.

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार ) चे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे हे आमदार असून महायुती सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून धनंजय मुंडे हेच उमेदवार असतील यात शंका नाही. मात्र, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. आज दुपारी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी देखमुख यांनी आपणही परळी मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. यावेळी पत्रकार परिषदेस काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ आणि ऊर्फ बहादुर , माजी शहराध्यक्ष प्रकाश देशमुख, इतेशाम खतीब, गडेकर, बद्द्रभाई,सिरसाठ,निर्मळ, रणजीत देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीत जागा कोणाला?दरम्यान, महाविकास आघाडीत परळी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )व काँग्रेस कडून अनेक जण इच्छुक आहेत. फुलचंद कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अनेक जण निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे. तसेच तसेच रासपाचे युवा माजी प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी देखील परळी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. फंड यांनी पक्ष प्रवेश करून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

मंत्री मुंडेंसाठी लोकसभेसारखीच विधानसभा निवडणूक आव्हानात्मकभाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याने या मतदारसंघातून आता महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे हे उमेदवार असणार आहेत. त्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी तयारी सुरू केली आहे.यातच आज काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. महा विकास आघाडीत मतदारसंघ कोणाला सुटतो हे अद्याप निश्चित झाले नाही. मात्र, मंत्री मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची अनेक नेत्यांची इच्छा आहे. यामुळे लोकसभेसारखेच विधानसभा देखील मुंडे भाऊ-बहिणींना आव्हानात्मक ठरेल अशी चर्चा आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Beedबीड