शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

तोतया परिक्षार्थी बसवणाऱ्यास सशर्त जामीन, राेज पोलीस ठाण्यात लावावी लागणार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 14:02 IST

म्हाडा परीक्षेत तोतया परीक्षार्थ्यास झाली होती अटक

बीड : म्हाडाच्या अभियांत्रिकी परीक्षेत तोतया परीक्षार्थ्यास १ फेब्रुवारी रोजी पकडले होते. मूळ परीक्षार्थी राहुल किसन सानप (रा.वडझरी ता.पाटोदा) यास येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अटी, शर्थीनुसार त्यास १३ फेब्रुवारीपर्यंत शिवाजीनगर ठाण्यात रोज हजेरी लावावी लागणार आहे.

अर्जुन बाबूलाल बिघोत (वय २८, रा. जवखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हा १ फेब्रुवारी रोजी राहुल सानप याच्या जागी म्हाडाच्या अभियांत्रिकी पदाची परीक्षा देण्यासाठी बीडला आला होता. परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश देताना त्याचे वर्तन संशयास्पद आढळले. त्यानंतर त्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. त्याच्याकडे डिव्हाइस, मोबाइल व मायक्रो यंत्र आढळून आले असून, ते जप्त केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या परीक्षेत वडझरी कनेक्शन समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. राहुल हा वडझरीचा रहिवासी असल्याने आरोग्य व टीईटी परीक्षेतील पेपरफुटीत अर्जुन बिघोतचा सहभाग आहे का, याची पडताळणी पुण्याच्या सायबर सेलच्या पथकाने बीडमध्ये येऊन केली आहे. ५ रोजी अर्जुन बिघोतची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. राहुल सानपने येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. त्यास ८ फेब्रुवारीस अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून ९ रोजी सकाळी त्याने शिवाजीनगर ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक शैलेश शेजुळ व पो.ना. मोहसीन शेख यांनी त्याची चौकशी केली.

चौकशीनंतर होईल खुलासाबनावट परीक्षार्थी अर्जुन बिघोतने चौकशीत सहकार्य केले नाही, त्यामुळे या रॅकेटमध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे, हे समोर आले नाही. मात्र, आता राहुल सानप १३ फेब्रुवारीपर्यंत रोज ठाण्यात हजेरी लावणार आहे. यावेळी त्याची सखोल चौकशी केली जाईल. चौकशी झाल्यानंतरच त्यास दररोज सोडण्यात येईल. यानंतर याप्रकरणात सर्व खुलासे होतील, असे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड