(फोटो)
बीड : दर्शपूर्णमास सर्वेात्तमकर्म अनुष्ठानांतर्गत पूर्णमास इष्टी यज्ञाचे तालुक्यातील बोरखेड येथे आयोजन करण्यात आले होते. यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत या यज्ञाची सांगता २९ जानेवारी रोजी झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
इष्टी यज्ञाची सुरुवात २९ रोजी झाली होती. पहिल्या दिवशी ब्रम्हवृंदाच्या उपस्थितीत अग्निमंथनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यअंबेची पूजा करण्यात आली. त्यानंतर श्रीसुक्त हवन करण्यात आले. तर, सांगतेच्या दिवशी दर्शपूर्णमास इष्टीयज्ञ मंत्रोच्चारात झाला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोरखेड येथील भास्कर पेशकार, सतीश पेशकार, संजय पेशकार, संतोष बुडूख, रवी पेशकार, सुरेश पेशकार, मनोज पेशकार, महेश पेशकार, अरुण पेशकार, पद्माकरराव कुलकर्णी, वैभव पेशकार, सौरभ पेशकार, माजी सरपंच बाळासाहेब काकडे, शहादेवराव हिंदोळे, विजयसिंह काकडे, अमोल देशमुख, सचिन गावडे, पोलीस पाटील रवींद्र देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.